Sharad Pawar vs Ajit Pawar : काकांनी भाकरी फिरवली, पुतण्याने तवाच उलटला; असं घडलं राष्ट्रवादीत बंड!
महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (2 जुलै) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics : NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (2 जुलै) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी 2019 मध्येही अशीच बंडखोरी करत गुपचुप उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी फरक फक्त इतकाच आहे की त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण, या बंडाची सुरूवात कधी आणि कशी झाली हे ही खूप रंजक आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar big twists IN NCP)
2019 मध्ये पहिले बंड!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली होती, त्यात भाजप आणि तत्कालीन शिवसेनेने एकत्र लढून यश मिळवले होते. पण मुख्यमंत्रिपदावरून बोलणी फिस्कटल्याने युती तुटली.
भाजपसोबत गेले अन् मंत्री झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काय आहेत भ्रष्टाचाराचे आरोप?
भाजपसोबतची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता. पण मध्येच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय वर्तुळाला मोठा हादरा दिला.
शरद पवारांची खेळी, अजित पवारांसोबत गेलेले आमदार परतले
त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर सुत्रं हलवत अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना परत आणलं. बहुमत सिद्ध करू न शकल्याने देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं सरकार तीन दिवसातच कोसळलं. यामुळे राष्ट्रीय राजकारणातील शरद पवार यांचं स्थान आणखी बळकट झालं.