Shiv Sena: राणे-सामंतांनी सुषमा अंधारेंना डिवचलं, पण ठाकरे गटाने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

shinde group claims that sushma andhares meeting in beed was not crowded thackeray group hits back
shinde group claims that sushma andhares meeting in beed was not crowded thackeray group hits back
social share
google news

बीड: शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेची समारोप सभा आधीपासूनच चर्चेत, वादात आली. आता सभा झाल्यावर गर्दीवरून चर्चा सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत, नितेश राणे यांनी सभेला गर्दी झाली नसल्याचे सांगत अंधारेंना डिवचलं आहे. तर ठाकरे गटाकडूनही (Thackeray Group) व्हिडिओ रिलिज करत पलटवार करण्यात आला. त्यामुळेच आपण या व्हिडिओत अंधारेंच्या सभेला गर्दी झाली होती की नाही. हे जाणून घेऊया. (shinde group claims that sushma andhares meeting in beed was not crowded thackeray group hits back)

ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या फाटाफुटीमुळे उद्धव ठाकरे पक्षातच एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या, वक्त्या सुषमा अंधारेंनी ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसातच त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या रांगेत जावून बसू लागल्या. शिंदे गटातल्या आमदारांच्या मतदारसंघात महाप्रबोधन यात्रा काढत त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याच यात्रेच्या ग्रामीण भागातल्या समारोपाची सभा बीडमध्ये झाली.

सुषमा अंधारेंच्या सभेला गर्दी झालेली की नाही?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. पण समारोप सभेच्या तोंडावरच अंधारेंवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पैसे मागितल्याचा आरोप केला. तसंच अंधारेंच्या दोन कानशिलात लगावल्याचाही दावा केला. दुसरीकडे शिंदे गटानेही कर्मचारी, व्यापाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं सांगत अंधारेंची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी

याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 20 मे रोजी बीडमध्ये नगर रोडवर महाप्रबोधन यात्रेची समारोप सभा झाली. जवळपास दोन तासांच्या रोडशोनंतर राऊत आणि अंधारे नऊच्या सुमारास सभास्थळी आले. तासाभरात दहाच्या आधी सभा संपली. राऊत आणि अंधारे दोघांनीही भाजप आणि शिंदे गटावर चौफेर हल्ला चढवला. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटानं सभेला गर्दीच नव्हती, असं म्हणत सभेच्या यशस्वीतिवेरच प्रश्न उपस्थित केले.

उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप आमदार नितेश राणे, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सभेला गर्दीच नसल्याचं सांगत फोटो शेअर केले. राणे आणि बन यांनी गर्दीवरून राऊतांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसतात. पण स्टेजवर अंधारे किंवा राऊत दिसत नाहीत. त्यामुळे हा फोटो नेमका कधीचा आहे, म्हणजे सभा सुरू असतानाच, सुरू होण्याआधीचा की संपल्यावरचा, हे स्पष्ट होत नाही.

ADVERTISEMENT

भाजप नेत्यांकडून शेअर करण्यात आलेला फोटो

हे ही वाचा >> Accident: दुसऱ्याचा जीव वाचवायला गेली अन्.. 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या याच आरोपांना ठाकरे गटानेही व्हिडिओ शेअर करत उत्तर दिलं आहे. शिल्पा बोडखे यांनी उदय सामंतांना उत्तर देताना लिहिलं की, जेव्हा यांना भाजपा व्हॉट्सअॅप युनिवर्सिटीचे सदस्य व्हायचीच इच्छा असेल तर मग मंत्री पद कशासाठी घेतले? उघडा डोळे आणि बघा नीट आणि भाजपा व्हॉट्सअॅप युनिवर्सिटीचा नाद सोडा…

ADVERTISEMENT

सुषमा अंधारेंनी शेअर केलेला फोटो

 

बोडखे यांनी सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खुर्च्या भरलेल्या दिसतात. भाजप, शिंदे गटाच्याच्या फोटोला ठाकरे गटानं व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT