Shiv Sena : ''मोदी-ठाकरे एकत्र येणार", शिंदेंच्या आमदाराच्या विधानाने राजकारणात खळबळ

मुंबई तक

Shahaji Bapu Patil On Narendra Modi-Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्या जागेवर संदीपान भुमरे उमेदवार असतील. त्यांचा त्या ठिकाणी विजय निश्चित असल्याचा दावा शहाजी बापू यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्या जागेवर संदीपान भुमरे उमेदवार असतील.
shiv sena eknath shinde mla shahaji bapu patil big statement on narendra modi and udhhav thackeray bjp shiv sena maharashtra politics
social share
google news

Shahaji Bapu Patil On Narendra Modi-Uddhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. कोणत्याहीक्षणी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असताना आता, ''1 हजार टक्के नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, माझा अंदाज कधीही चुकणार नाही'', असे खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ( shiv sena shinde mla shahaji bapu patil big statement on narendra moid and udhhav thackeray bjp shiv sena maharashtra politics) 

आमदार शहाजीबापू पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना  शहाजीबापू पाटील यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले होते. जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटतं असते. परंतु तीनही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंवर भडकले बावनकुळे; म्हणाले, "तुम्ही मिंधे..."

शहाजी बापू यांनी यावेळी संजय राऊतांवरही टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्राचा खलनायक आहे. त्यांच्याकडे दुर्योधन म्हणून लोक पाहतात. त्यांच्या वक्तव्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली. 

दरम्यान निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस ही महत्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचेही असू असतात. मध्यप्रदेश, राजस्थान आणि बीआरएसचा सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे, असे शहाजी बापू म्हणालेत. 

विधानसभेला महायुती 'इतक्या' जागा जिंकणार 

तसेच छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्या जागेवर संदीपान भुमरे उमेदवार असतील. त्यांचा त्या ठिकाणी विजय निश्चित असल्याचा दावा शहाजी बापू यांनी केला आहे. 

हे ही वाचा : Loksabha Election: 'महायुतीनं अश्वासन पाळावं', राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं

दरम्यान आम्ही आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उप मुख्यमंत्री अजित पवार या त्रिमुर्तीच्या जोरावर जिंकणार आहे. आम्हाला या निवडणुकीत 225 च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp