आमदार अपात्रता सुनावणीस विलंब, कोर्टाने फटकारलं; राहुल नार्वेकर म्हणतात…

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Rahul Narvekar Reaction on Supreme court order : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  यांना फटकारले आहे. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात उशीर करू नये.आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीची तारीख सांगावी आणि आठवड्याभरात वेळापत्रक द्यावे, असे आदेश दिले आहेत. या निर्देशानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमके काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊयात. (shiv sena mlas disqualification supreme court order rahul narvekar reaction ekanth shinde vs udhhav thackeray)

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय सांगितले,याबाबत मला माहित नाही, पण कोर्टाची ऑर्डर आल्यास ती वाचून याबाबतची अधिकृत भूमिका मांडेन असे राहुल नार्वेकर म्हणालेत. तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणात कुठल्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही. तसेच जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती नियमानुसार होईल. या कारवाईसाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मात्र जे नियमानुसार आहे तेच केलं जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : Crime News : अवघ्या 115 रुपयांवरून पेटला वाद अन् थेट मित्रावरच केले सपासप वार!

आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दिरंगाई करण्याचा माझा हेतू नाही, मात्र कुठल्याही दबावाला बळी पडून घाई घाईने सुद्धा सुनावणी करणार नाही. विधानाच्या तरतुदीनुसार ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या पाळूनच पुढील सुनावणी होईल, असे देखील राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच ठाकरे गटाचे सुनील प्रभू अजय चौधरी कागदपत्रांची पडताळणी करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते इन्स्पेक्शन करावे. विधिमंडळातील जी कारवाई आहे ती नियमानुसार सर्व गोष्टींची चाचपणी करूनच केली जाईल,असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घ्यावाच लागेल,या प्रकरणात उशीर करू नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आम्ही अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितले. चार महिने उलटले नोटीस पाठवण्याच्या पलिकडे काय झालंय? असा सवालही सरन्यायाधीशांनी उपस्थित केला होता.सुप्रीम कोर्टात 11 मेला दिलेल्या निर्णयावेळी आम्ही कालमर्यादा ठरवून दिली नव्हती. पण, अध्यक्षांनीसुध्दा सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा सांभाळणं आवश्यक आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीची तारीख सांगावी आणि आठवड्याभरात वेळापत्रक द्यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.

हे ही वाचा : ‘तुमचं रॉकेट कोणत्या जागेत घालेन…’, कल्याणमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष पेटला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT