Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांचा पुतळा कोसळला अन् ठाकरेंचा आमदार संतापला, 'ते' ऑफिसच फोडलं!
Sindhudurg: सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली. त्यानंतर शिवसेना यूबीटी आमदार वैभव नाईक यांनी pwd कार्यालयाची तोडफोड केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला
9 महिन्यांपूर्वीच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता
दुर्दैवी घटनेनंतर वैभव नाईकांकडून PWD कार्यालयाची तोडफोड
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse: सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग किल्ल्यानजीनकच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज (26 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली. ज्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर मालवणचे शिवसेना (UBT)पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर स्वत: PWD कार्यालयात घुसून तुफान तोडफोड केली असल्याचं आता समोर आलं आहे. (shiv sena ubt mla vaibhav naik vandalized pwd office after statue of chhatrapati shivaji maharaj collapsed in sindhudurg)
ADVERTISEMENT
वैभव नाईकांकडून तुफान तोडफोड
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांनी या घटनेबाबत राग व्यक्त केला. ज्यानंतर वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर थेट हल्ला चढविण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. त्यामध्ये खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच आतमध्ये ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांना देखील काही दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा>> Viral News : ''आप्पाचा विषय लय हार्ड ए, आप्पाकडे मागितला OTP पण...'', मुंबई पोलिसांची हटके जनजागृती
नेमकी घटना काय?
अवघ्या 9 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अचानक कोसळला. हा पुतळा अगदी समुद्रकिनारी उभारण्यात आला होता. पण सोसाट्याच्या वारा आणि पाऊस यामुळे हा पुतळा पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अगदी 9 महिन्यांपूर्वीच हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हे वाचलं का?
9 महिन्यातच पुतळा कोसळला
4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण केले होते. या अनावरणाला आता नऊ महिने उलटले आहेत. पण अवघ्या 9 महिन्यात शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामकाजाच्या निकृष्टतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावरून आता स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.
हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj : धक्कादायक! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 9 महिन्यांपूर्वी PM मोदींनी केलेलं अनावरण
महाराजांचा अवमान करणाऱ्या गद्दारांना गाडणार
या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत मिंधे-भाजप सरकारने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक केवळ 9 महिन्यांत कोसळले. महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच', अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने महायुतीवर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT