ठाकरेंना मिळणार सर्वाधिक जागा! राऊतांनी सांगितली आतली बातमी
महाविकास आघाडीची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत मविआमध्ये असलेला ठाकरे गट आता लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Mahavikas Aghadi: राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडामोडींना प्रचंड वेग आलेले असतानाच उद्या अपात्र आमदारांच्या (MLA disqualification) निर्णयावर महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याच धर्तीवर आता दिल्लीतही महाविकास आघाडीच्या बैठकींना वेग आला आहे. लोकसभेच्या जागांचे गणित सोडवण्यासाठी मविआच्या बैठकींना वेग आला असून आज दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या घरी झालेल्या बैठकीत फॉर्म्युला ठरल्याचे संकेत देण्यात आले आहे. त्यातच खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या बैठकीविषयी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्वात जास्त जागा लढविणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
‘मविआ’मध्ये सकारात्मक चर्चा
खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी आजच्या महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याच बरोबर आजच्या झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याची चर्चा केली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी येणार असल्याने भविष्यातील निवडणुकांची गणित वेगळी असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.
हे ही वाचा >> हे काय घडलं भलतंच? सासूच्या रचलेल्या चितेवर जाऊन बसली सून…
उद्याच्या निर्णयावर ठरणार
राज्याच्या राजकारणात अपात्र आमदारांवर 10 जानेवारी रोजी निर्णय येणार आहे. त्यामुळेच राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला. दिल्लीत झालेल्या आजच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट सर्वात जास्त जागा लढणार असून त्यावरही सकारात्मक चर्चा झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ठाकरे गटाला 23 जागा
महाविकास आघाडीसोबत असलेला ठाकरे गट लोकसभेत 23 जागा लढणार असल्याचे काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या दिल्लीतील बैठकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की,आताही 20 पेक्षा जास्त जागा लढविण्याच्या विचारावर ठाकरे गट ठाम असून यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचबरोबर वंचितला सोबत घेण्याचा महत्वाचा निर्णय झाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा >> Sunil kedar : काँग्रेसचा नेता येणार तुरुंगातून बाहेर, कोर्टाने शिक्षा केली निलंबित
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT