BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदेंच्या नेत्यावर झाडल्या 4 गोळ्या, पोलीस ठाण्यात घडलं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Shivsena Leader Mahesh Gaikwad allegedly shot by bjp MLA Ganesh Gaikwad Inside Ulhasnagar Police Station
Shivsena Leader Mahesh Gaikwad allegedly shot by bjp MLA Ganesh Gaikwad Inside Ulhasnagar Police Station
social share
google news

Shiv sena Leader shot by BJP MLA : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) शुक्रवारी (02 जानेवारी) रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड (Shivsena Leader Mahesh gaikwad) यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये हा गोळीबार झाला, जिथे दोन राजकारणी आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी आमदाराला ताब्यात घेतले. (Shivsena Leader Mahesh Gaikwad allegedly shot by bjp MLA Ganpat Gaikwad Inside Ulhasnagar Police Station)

जखमी नेत्याची प्रकृती चिंताजनक

भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. या वादामुळे दोन्ही नेते व त्यांचे समर्थक हिल लाईन पोलीस ठाण्यात जमा झाले. दरम्यान, दोन गटातील वाद अधिकच वाढला असून पोलीस ठाण्यातील गोळीबारात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटनेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

वाचा : Ganpat Gaikwad: खळबळजनक… BJP आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या 4 गोळ्या

या गोळीबारात महेश गायकवाड आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रात्री 11 वाजता उल्हासनगर येथील मीरा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने दोन्ही नेत्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. माहितीनुसार आमदार गणपत गायकवाड यांनी महेशवर एकूण चार गोळ्या झाडल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपी आमदार गणपत गायकवाड यांचा मोठा दावा

एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, या घटनेवर न्यायालय जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवसेनाप्रमुखांच्या राजवटीत गुन्हे वाढल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे भाजपचा ‘दगा’ करतील, असा आरोपही गायकवाड यांनी केला.

आरोपी भाजप आमदार पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची फसवणूक केली आणि ते भाजपची अशीच फसवणूक करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडूनही लाखो रुपये हडप केले आहेत. या घटनेबाबत न्यायालय जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल.”

ADVERTISEMENT

वाचा : संभाजीराजेंचं ठरलं! ‘या’ मतदारसंघातून लढविणार निवडणूक, बोलणी फायनल…

पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

गोळीबाराच्या या घटनेबाबत डीसीपी सुधाकर पठारे म्हणाले, ‘महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी होऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

वाचा : महाराष्ट्रात बाजी कोण मारणार NDA की INDIA?, एक्झिट पोलनुसार 48 जागांचं चित्र कसं असणार?

जमिनीवरून पेटला वाद

या घटनेनंतर महेश गायकवाड यांचे समर्थक संतप्त आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यामुळे दोघांनीही आपल्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात त्यांचा वाद पेटला आणि गणपत यांनी महेश यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यावेळी शिवसेनेचे राहुल पाटील यांनाही गोळी लागली. महेश यांच्या पोटात आणि इतर ठिकाणी चार गोळ्या लागल्या. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT