Maharashtra Politics : शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?
शिवसेनेच्या खासदार गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) यांनी काही दिवसांपुर्वीच भाजपाकडून सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. मात्र वेळीच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या विधानावर सारवासारव करत पडदा पाडला होता.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या खासदार गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) यांनी काही दिवसांपुर्वीच भाजपाकडून सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. मात्र वेळीच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या विधानावर सारवासारव करत पडदा पाडला होता. दरम्यान यावर तुर्तास पडदा पडला असला तरी भाजप-शिवसेनेचे (BJP-Shivsena) टेन्शन काही कमी झाले नाही. कारण आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या जागावाटपावरून पुन्हा एकदा वाद उफाळणार आहेच. त्यामुळे आता हा वाद टाळून शिंदे-फडणवीस ठरल्यानुसार जागावाटप करून घेते का हे आगामी काळात कळणार आहे. (shivsena mp gajanan kirtikar demand loksabha election seat will create tension between shivsena bjp government)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार 13 खासदारांसह बडंखोरी भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती. आता या 13 खासदारांमधील खासदार गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) यांनी भाजप सोबत सत्तेत असताना आणि लोकसभेच्या जागावाटपावरून मोठं विधान केले होते. आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदेबरोबर आलो असून एनडीएत घटक पक्ष आहोत.यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग नसल्याने आमची कामे झाली पाहिजेच.घटकपक्षाचा दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे, असे विधान करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली होती.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंहांच्या विरोधात थोपटले ‘दंड’! PM नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
तसेच आगामी लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावर बोलताना गजानन किर्तीकर म्हणाले होते की, 2019 मध्ये भाजपाने 26 जागा लढवल्या होत्या.यामध्ये शिवसेनेने 22 जागा लढवून 18 जिंकल्या होत्या. तसेच कलाबेन डेलकर यांनी दादर नगर हवेलीत पोटनिवडणूक जिंकली होती. त्यामुळे शिवसेनेकडे 19 जागा झाल्या. लोकसभेत शिवसेनेत यापुर्वी इतक्या जागा जिंकल्या नव्हत्या. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचे वाटप ठरल्याप्रमाणे झाले पाहिजे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष 22 जागेवर लोकसभा निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहे,असे किर्तीकर यांनी म्हटले होते.
हे वाचलं का?
दरम्यान किर्तीकर यांच्या सापत्न वागणूकीच्या आणि लोकसभेतील जागा वाटपाच्या दाव्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर य़ांनी भाजप-शिवसेनेत सर्व काही आलबेल आहे. जर काही गैरसमज असतील तर ते दुर केले जातील,अशी सारवा सारव केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमच्यात कोणताच वाद नाही आहे.आम्ही समन्वयाने काम करत असल्याचे विधान करून पडदा पाडला होता.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नामांतर! अहमदनगरमध्ये CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप हळूहळू एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे, कारण पक्षात त्यांची उपयुक्तता कमी होत चालली आहे. लोकसभेच्या जागा कोण लढवणार यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असल्याचे देखील राऊतांनी पोखरून काढले होते. सध्या भाजप -शिंदेच्या नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, आगामी काळात भापज-शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे इतकं मात्र नक्की.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT