Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis high level inquiry will be conducted alleged offensive video of bjp leader kirit somaiya viral video
devendra fadnavis high level inquiry will be conducted alleged offensive video of bjp leader kirit somaiya viral video
social share
google news

Kirit somaiya latest news: मुंबई: भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या वरिष्ठ सभागृहात देखील पाहायला मिळाले. विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमय्यांबाबतचं प्रकरण सभागृहासमोर मांडलं. तर शिवसेना (UBT) आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी अत्यंत आक्रमकपणे यावरुन सोमय्यांवर हल्ला चढवला. या सगळ्या माध्यमातून शिवसेनेने भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहातच एक मोठी घोषणा केली. (speaking in legislative council devendra fadnavis high level inquiry will be conducted alleged offensive video of bjp leader kirit somaiya viral video)

ADVERTISEMENT

‘या संपूर्ण प्रकरणाची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत सरकार अजिबात नरमाईची भूमिका घेणार नसल्याचं आश्वासन फडणवीसांनी सभागृहाला दिलं.

पाहा सोमय्यांच्या ‘त्या’ Video बाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘जो विषय अंबादास दानवे, अनिल परब यांनी मांडला आहे तो विषय नक्कीच गंभीर आहे. त्यांनी ज्या भावना मांडल्या आहेत त्या भावनांशी एकप्रकारे मी देखील सहमत आहे. राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की, ज्यामध्ये माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागतं, केलेली पुण्याई पणाला लागते. आता हा जो काही प्रकार समोर आला आहे. आपल्याकडे काही तक्रारी असतील तर त्या देखील द्या. त्याचीही चौकशी करू.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा कथित आक्षेपार्ह Video Viral, ‘सामना’ने ‘कशी’ दिली बातमी?

‘आपण काही गृहितकं सांगितली.. गृहितकांवर चौकशी होत नाही. पण काही ठोस पुरावे असतील तर देखील आमच्याकडे द्या.. त्याचीही चौकशी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.’

‘कोण महिला आहे? असं आपण विचारलं आहे.. तशी ओळख आपल्याला सांगता येत नाही.. ती ओळख त्या केसपुरतं पोलिसांना सांगितली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून ती ओळख देखील हुडकून काढतील. अर्थात आपण अशी ओळख कधीच जाहीर करत नाही. पण आपण या संदर्भात बिल्कुल काळजी करू नका.’

‘अशाप्रकारचं कुठलंही प्रकरण दाबणं, मागे टाकणं, लपवणे.. असं काहीही केलं जाणार नाही. सोमय्यांनी देखील पत्र लिहून मागणी केली आहे की, चौकशी करा. आपण स्वत:ही मागणी करत आहात की, चौकशी करा. याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

अंबादास दानवेंनी किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह दिला सभापतींना, म्हणाले…

दरम्यान, याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “काही राजकीय पक्षातील मंडळी ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते बघून या फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना ते छेद देताहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणातील काही लोक ईडी, सीबीआयची भीती दाखवतात आणि त्याआडून लोकांना ब्लॅकमेल करतात. त्याचं एक्स्टॉर्शन करतात. हीच व्यक्ती त्यांच्या पक्षातील माता-भगिनींना पद देतो. महामंडळ देतो. माझे ईडीच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे. सीबीआयशी संबंध आहेत. असं सांगून एकप्रकारे महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, या पक्षाचा मोठा पदाधिकारी राहिलेला मोठा माणूस… ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आल्यात त्या धक्कादायक आहेत.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?

“अनेक महिलांना राज्यसभा, विधानसभा, महामंडळात नियुक्ती करण्याचं सांगून काही अधिकाऱ्यांचं एक्स्टॉर्शन करण्यात आल्याच्या घटना माझ्यापर्यंत काही माता-भगिनींनी मांडल्या आहेत. गुन्हा करणारी व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाची हा विषय महत्त्वाचा नाहीये. अपप्रवृत्ती आहे. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. त्या भगिनीने हे व्हिडीओ अतिशय हिंमत करून माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. तिला मी सलाम करेन”, असं ते म्हणाले.

“या व्यक्तीला सीआयएसएफची सुरक्षा आहे. केंद्राची सुरक्षा आहे. याचा वापर महिलांचं शोषण करण्यासाठी केला जातो की काय, अशी स्थिती आहे. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला गेला आहे. खडसे साहेब, आठ तासाचे व्हिडीओ आहेत. मी सभापतींना ते देणार आहे. अशी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषतः मराठी भगिनींचं शोषण केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. सरकार महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतं. नैतिकतेबद्दल बोलतं. राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आलेले आहेत आणि मराठी माता-भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करताहेत. असे जे आहेत त्यांचं नाव मी घेतो. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे”, असा हल्लाबोल दानवे यांनी सभागृहात केला.

“किरीट सोमय्याचा माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. सभापती महोदय, अत्यंत किळसवाणं आहे. हे पेन ड्राईव्ह मी आपल्याला देतो. बघावं असं नाहीये. पण, संरक्षण दिलेल्यांवर सरकार कारवाई करणार का? यांचं संरक्षण काढणार का? हे पेन ड्राईव्ह बघा आणि राज्य सरकारला निर्देश द्या. जर संवाद ऐकले, तर ज्या पद्धतीने मराठी माणसाविषयी, मराठी स्त्रियांविषयी ज्या पद्धतीने बोलले आहेत. याचा तपास करावा. गृह मंत्रालयाला पेन ड्राईव्हचे अवलोकन करून योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडावे”, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT