'महायुतीच्या मर्यादा...', फडणवीसांनंतर मुनगंटीवारांनी रामदास कदमांचे टोचले कान
Sudhir mungantiwar slams ramdas kadam : महायुतीमध्ये कोणत्याही नेत्यांनी आपले मत, भाष्य मांडताना ज्या महायुतीच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहूनच मांडले पाहिजे, असा शब्दात मुनगंटीवार कदमांना खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
Sudhir mungantiwar slams ramdas kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सूरू असताना,
'भाजपने आमचा केसाने गळा कापू नये' असं विधान शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी करून भाजपवर टीका केली होती. या टीकेवर आता देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता 'महायुतीच्या मर्यादेत राहूनच मत मांडा', अशा शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) शिंदे गटाचे आमदार रामदास कदमांना (ramdas kadam) सुनावलं आहे. (sudhir mungantiwar slams ramdas kadam on lok sabha seat sharing shinde mla maharashtra politics)
ADVERTISEMENT
सुधीर मुनगंटीवार प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रामदास कदमांच्या विधानावर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही नेत्यांनी आपले मत, भाष्य मांडताना ज्या महायुतीच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहूनच मांडले पाहिजे, असा शब्दात मुनगंटीवार कदमांना खडेबोल सुनावले आहेत. बारा लोकांची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये मीही एक सदस्य आहे. कोर टीमच्या सदस्यांमध्ये अशा विषयावरती चर्चा होते आपण जाहीर मध्ये एखादी चर्चा सुरू केली तर त्यावर दुसराही उत्तर देतो आणि मग थांबवणे कठीण होते, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : 'गल्लीत बॅटबॉल खेळला म्हणून BCCI चा अध्यक्ष...'
तसेच महायुतीमध्ये सध्या तीन पक्षाच्या संदर्भात लोकसभेबाबत चर्चा सुरू आहे. व्यक्तिगत जे आमदार आहेत त्यांच्याशी त्या पक्षांने चर्चा करावी असं अपेक्षित आहे. ज्या पक्षांच्या सोबत ते उभे आहेत त्या पक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि तशी चर्चा भविष्यात राहील, असे सुधीर मुनगंटीवार बच्चू कडूंच्या आरोपांवर म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
कदमांवर फडणवीस काय म्हणाले?
'मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो... अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधीकधी ते रागाने देखील बोलतात. भाजपने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही 115 आहोत. तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे.'
हे ही वाचा : Crime : आधी भांडण झाली, मग गळाच घोटला; नवऱ्याने बायकोला का संपवलं?
'आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे. आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल.. यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. आता हे ठीक आहे की, अनेकवेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्याकरिता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरिता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT