‘तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर, मला…’, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट, अजितदादांवर हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule criticized ajit pawar on nashik yewala meeting maharashtra politic
supriya sule criticized ajit pawar on nashik yewala meeting maharashtra politic
social share
google news

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज नाशिकच्या येवल्यात सभा पार पडली आहे. या सभेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांवर (Ajit Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर पद मिळालं नसतं. पण माझ्या विचारांची माझी निष्ठा आहे, पद नाही मिळालं तरी चालेल माझा विचार सोडणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. (supriya sule criticized ajit pawar on nashik yewala meeting maharashtra politics)

ADVERTISEMENT

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवल्यात शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेला खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारखे अनेक नेते उपस्थित होते. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि अजित पवार गटावर टीका केली. काय मागितलं हो, मी राष्ट्रवादी पक्षात…, इतके वर्ष निष्ठेने काम करते. एकदा फक्त लोकसभेच तिकीट मागितलं. कधी विधानसभेच मागितलं, कधी पद मागितलं. तुम्हाल काय वाटतं मी गेले असते तर पद मिळालं नसतं. पण माझ्या विचारांची माझी निष्ठा आहे, पद नाही मिळालं तरी चालेल माझा विचार सोडणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली.

हे ही वाचा : ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी आम्हाला…’, मुनगंटीवारांची शरद पवारांवर बोचरी टीका

मी घाबरतंच नाही, घाबरत असते तर गेले नसते का? जो डर गया, वो मर गया, असा शोलेचा डायलॉग देखील सुप्रिया सुळे यांनी सभेत मारला. तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना ICE चा अर्थही सांगितला. I म्हणजे इन्कम टॅक्स, C म्हणजे सीबाय आणि E म्हणजे ईडी, जो विरोध करले त्याला ICE करणार असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. आलं काळ शर्ट टाकलं वॉशिंग मशीनमध्ये, टाकली भाजपची पावडर बाहेर निघाला पांढरा शर्ट, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या नोकऱ्या दुसऱ्या राज्य़ात,महाराष्ट्राचा विकास दुसऱ्या राज्यात…महाराष्ट्रातील मोठे नेत्यांचा कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरु आहे…बाळासाहेबांचे केले आता शरद पवारांचं सुरू आहे. हे सगळ षडयंत्र दिल्लीतलं अदृष्य हात करतायत, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर केली.

हे ही वाचा : Exclusive: ‘अजितला तीनदा उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला…’, शरद पवार अखेर मनातलं बोललेच!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT