Supriya Sule : अजित पवारांचे बोल जिव्हारी; सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या...
Supriya Sule Ajit Pawar Baramati Lok Sabha 2024 : बारामतीतील एका भाषणात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती, त्याला खासदार सुळेंनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

सेल्फी आणि संसदेतील भाषणाच्या मुद्द्यावर काय बोलल्या?

अजित पवारांना उत्तर देताना सुळे काय म्हणाल्या?
Supriya Sule Ajit Pawar Baramati Lok sabha 2024 Election : अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांकडून थेट सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारांनी सेल्फी आणि भाषणावरून सुप्रिया सुळेंवर टीका केली. त्यावरून सुळेंनी खडे बोल सुनावले आहेत.
अजित पवार बारामतीत बोलताना म्हणाले होते की, 'संसदेत भाषणं करून कामं होतं नाही. सेल्फी काढणं म्हणजे विकास नाही.' याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तो त्यांचा विषय आहे. हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल. आणि दोन गोष्टी तुम्हाला आर्वजून सांगते. सेल्फीचा विषय तुम्ही काढला. चांगलं केलं. खरंतर पंतप्रधानांनी एक ऑर्डर काढली आहे. ती ऑर्डर मी संसदेत वाचून दाखवली आहे."
"मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक जीआर देशासाठी काढला होता की, प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. अशी एक बातमी आली होती की, स्मृती इराणींना पंतप्रधानांनी असं सांगितलं होतं की, देशातील एक कोटी महिलांबरोबर सेल्फी काढा. स्टेशनपासून, कॉलेजपासून सगळीकडे मोदीजींचे सेल्फी पॉईंट्स लावा", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"सेल्फी काढायला मोदींनी सांगितलं"
"भाजपचे सहकारी मला विमानात भेटले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. राजेश पांडेंजी भेटले. त्या पुस्तक प्रदर्शनातही तीन सेल्फी पॉईंट होते. एक मोदीजींचा. एक पहिल्या उपमुख्यमंत्र्यांचा, एक दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि एक मुख्यमंत्र्यांचा. असे चार सेल्फी पॉईंट होते. दिल्ली विमानतळावर प्रवेश करतो, तिथेही मोदीजींचा सेल्फी पाईंट आहे. त्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाही. या देशाचे पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान जरी वेगळ्या विचारात काम करत असले, तरी ते देशाचे पंतप्रधान आहे. देशाचे पंतप्रधानच आम्हा खासदारांना सांगतात की, जावा सेल्फी काढा. पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांच्या विचारांचा आम्ही मान सन्मान करतो", असे सांगत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला.