Supriya Sule Mumbai tak Baithak 2024: "एकाच गोष्टीमुळे मी लोकसभेला तरले"
Supriya Sule News: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी कशी सुरू आहे? यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंचे भाष्य...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंचं पहिल्यांदाच भाष्य
सुप्रिया सुळेंनी सांगितला लोकसभेचा अनुभव
Mumbai Tak Baithak Supriya Sule : राज्यातील सर्वच राजकीय नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही यात्रा सुरू आहे. शरद पवार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मुंबई Tak बैठक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आईबद्दलचा एक किस्साही सांगितला.
दोन माझ्यासोबत, तर चार माझ्याविरोधात होते -सुप्रिया सुळे
लोकसभा निवडणुकीत यावेळी बारामतीचे आमदार (अजित पवार) तुमच्यासोबत नव्हते. त्यामुळे कधी तुमच्या लक्षात आले की, आपल्याला संधी आहे. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एकतर दोन आमदार, एक भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप हे पूर्ण ताकदीने माझ्याबरोबर उभे राहिले होते. बाकीचे चार माझ्याविरोधात होते."
हेही वाचा >> ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला
"पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटी, दूध संघ, बँक, सरपंच, ग्रामपंचायत सगळंच ते (अजित पवार) घेऊन गेले होते. अदृश्य शक्तीने ठरवलंच होतं की आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून पुढे जायचं. पक्षही नव्हता, चिन्हही नव्हतं", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
त्यामुळे मी पुर्ण ताकदीने लढले; सुप्रिया सुळेंनी सांगितला अनुभव
"एकाच गोष्टीमुळे मी तरले, जे मी आधी कधी मीडियात बोलले की नाही, मला माहिती नाही. पूर्ण ताकदीने मी फक्त आईच्या एका वाक्यामुळे लढले. एकतर माझा बॅकफूटवर खेळण्याचा स्वभाव आहे. मी अति यशात वाहत जात नाही किंवा मला अति दुःख झालं की त्याचा सुवर्ण मध्य साधून काहीतरी करायचं असतं", असे सुप्रिया सुळे त्यांच्या आईबद्दल म्हणाल्या.
हेही वाचा >> लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तुम्ही मला म्हणाला ना की, अरे तुझा सर्व्हे दाखवतोय, तू पाच लाखांनी येतेय. मी म्हणेन ठिक आहे, बघुयात. मला माझे प्रमाणपत्र हातात हवे. हातात वास्तव आल्याशिवाय मी सेलिब्रेशन करत नाही. सेलिब्रेशनची वेळ येते तेव्हा मला वाटतं की, नको, पुढे आव्हानं आहेत, त्यामुळे संथ चाललेलं बरं."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT