देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी पलंग बसवण्यासाठी 21 लाखांच्या निविदा, सुषमा अंधारेंचा आरोप
Sushma Andhare on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी पलंग बसवण्यासाठी 21 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप

वर्षा निवासस्थानी पलंग बसवण्यासाठी 21 लाख रुपयांच्या निविदा, अंधारेंचा आरोप
Sushma Andhare on Devendra Fadnavis, Nagpur : राज्यातील पूरग्रस्तांना कोणतीही मदत मिळत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पलंग बसवण्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. भाजप हा स्वतः मोठा पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी भाजपमध्ये घेतलंय. भाजप भाडोत्री पक्ष उभा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला.
महायुतीतील नेते पूरग्रस्त भागाला राजकीय पर्यटनासाठी जातात - अंधारे
"एका बाजूला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करत आहेत, परंतु फडणवीसांकडे त्यांच्यासाठी निधी उपलब्ध नाही. मात्र, वर्षा बंगल्यावर पलंग उभारण्यासाठी 21 लाखांची निविदा जाहीर केली जाते. शिवाय महायुतीतील इतर नेते पूरग्रस्त भागाला केवळ राजकीय पर्यटनासाठी भेट देत आहेत," असंही सुषमा अंधारे या वेळी बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा : लोकसभेला उभे राहिले, गावाने लीड अन् निधी दिला; पण नंतर कधी फिरकलेच नाहीत, सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी अडवलं