39 कोटींचा इन्शुरन्स, पैशाच्या विचाराने मनातला राक्षस जागा, लहानाचं मोठं केलेल्या आई-बापाचा काटा काढला; पत्नीचाही ..
Crime News : 39 कोटींचा इन्शुरन्ससाठी मुलाने स्वत:च्या आई-बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इन्शुरन्सच्या पैशांसाठी मुलाने स्वत:च्या आई-बापाची हत्या केली

लहानाचं मोठं केलेल्या आई-बापाचा काटा काढला
Crime News : मुलाने इन्शुरन्सच्या पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या आई-बापाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका मुलाने विम्याच्या पैशासाठी नातेसंबंधांना काळीमा फासला आहे. मुलाने विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना संपवण्यासाठी कटकारस्थान रचलं आणि त्यांचा अपघात झाल्याचं दाखवलंय. दरम्यान, आरोपीच्या पत्नीचाही अपघातात मृत्यू झाला असून त्यातून देखील आरोपीने इन्शुरन्सचे पैसे मिळवले आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याचा साथीदार यांना अटक केली असून तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील हापुड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशाल सिंघलवर सनसनाटी आरोप
हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संजय कुमार यांनी हापुड नगर कोतवालीमध्ये आरोपी विशाल सिंघलविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. संजय कुमार यांनी सांगितले की, मृतक मुकेश सिंघल यांच्या नावावर अनेक विमा पॉलिसी होत्या. त्यांचं वार्षिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये होतं. त्यांच्या पॉलिसींमधून एकूण मिळणारा विमा सुमारे 39 कोटी रुपयांचा आहे.
संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीमध्ये मुलगा विशाल कुमारने विमा दावा केला होता. त्यात नमूद केले होते की 27 मार्च 2024 रोजी गढ गंगा येथून परतताना मुकेश सिंघल यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, मेरठच्या नवजीवन रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार अपघात रात्री झाला होता आणि त्यानंतर आनंद रुग्णालयात त्यांचा मृत्यू दाखवला गेला होता. संजय कुमार म्हणाले की, मृतकाच्या मुलाने अपघाताचे कारण सांगितले असले तरी पोस्टमॉर्टम अहवालातील जखमा आणि मुलाने सांगितलेल्या जखमा यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रकरण हत्या आणि फसवणुकीचे असल्याचा संशय आहे.