‘पवारांच्या तोंडून सत्य.. गुगलीमुळे माझ्याऐवजी त्यांचे पुतणेच..’, फडणवीसांचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

After Sharad Pawar criticized Devendra Fadnavis in a press conference in Pune, Fadnavis has once again replied.
After Sharad Pawar criticized Devendra Fadnavis in a press conference in Pune, Fadnavis has once again replied.
social share
google news

नवी दिल्ली: ‘देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सत्तेशिवाय करमत नव्हतं ते अस्वस्थ होते. हेच जनतेसमोर आम्हाला आणायचं होतं. त्यामुळेच मी गुगली टाकली. त्यांनी विकेट दिली तर ती मी घेणारच ना?’, असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबत काही गौप्यस्फोट केले. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तात्काळ प्रत्युत्तर दिलं. ‘माझ्या गुगलीमुळे पवारांच्या तोंडून सत्य बाहेर आलं. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच (Ajit Pawar) बोल्ड झाले आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (sharad pawar vs devendra fadnavis swearing in criticism fadnavis has once again replied googly bold ajit pawar)

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं होतं की, 2019 साली शरद पवार यांनी डबलगेम केला. त्यामुळेच आमचं सरकार बनू शकलं नाही. यानंतर शरद पवार यांनी आज (29 जून) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर खास आपल्या शैलीत टीका केली. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या गुगलीमुळे शरद पवारांच्या तोंडून बाहेर आलं: फडणवीस

‘मला खूप आनंद आहे की, पवार साहेबांना शेवटी सत्य सांगावं लागलं. कमीत कमी सत्य तरी मी पवारांच्या तोंडी आणलं.. पण हे देखील अर्ध सत्य आहे. उरलेलं सत्य देखील लवकरच बाहेर आणेन. मी देखील गुगली टाकेन आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने एक सत्य तर बाहेर आणलं. आता उरलेलं सत्यही बाहेर येईल मी त्यांच्याकडूनच सत्य वदवून घेईन.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले

‘एवढंच आहे की, त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वत:च्या पुतण्यालाच बोल्ड केलं आहे. पण काही हरकत नाही. उरलेलं सत्य लवकरच बाहेर येईल.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यांनी विकेट दिली तर, मी घेणारच ना..: शरद पवार

पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, ‘ती शपथ घ्यायची होती तर.. ती अशी चोरून का घेतली पहाटे? त्यांना जर शपथ घ्यायची होती आणि त्यांना पाठिंब्याची जर खात्री होती.. ती शपथ घेतली आणि त्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता तर दोन दिवसात ते सरकार राहिलं का तिथे?’

ADVERTISEMENT

‘दोन दिवसात त्यांची सत्ता गेली.. त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती. ती पावलं एकदा समाजाच्यासमोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या’

ADVERTISEMENT

‘असं आहे की, चर्चा सगळ्या झाल्या… काही करुन त्यांना आमची मदत हवी असेल तर काय आहे.. कसली मदत.. कशासाठी? काय लाइन.. या सगळ्या गोष्टी बोलल्याशिवाय कोणी चर्चा करतं काय?’

‘तीन ते चार दिवसांआधी मी माघारी आलो असं ते म्हणतात याचा अर्थ तीन दिवस माघारी आलो तर त्यांनी शपथ का घेतली? यातून अर्थ काय काढायचा तो काढा..’

हे ही वाचा>> ‘ती जाहिरात म्हणजे मूर्खपणा होता…’, अखेर देवेंद्र फडणवीस मनातलं बोललेच!

‘असं आहे की, हा डाव होता की काय होता मला माहिती नाही… पण माझे सासरे होते त्यांचे नाव सदू शिंदे.. जे देशातील उत्तम गुगली बॉलर होते. या गुगली बॉलरने मोठ्या मोठ्या लोकांच्या विकेट्स घेतल्या होत्या आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा.. मी जरी खेळलो नसलो तरी माहित होतं. यापेक्षा जास्त काही विचारू नका. आता विकेट दिली.. तर करायचं काय? ती विकेट घेतलीच पाहिजे. ते काही म्हणतील आता.. ते त्यांची विकेट गेलीए हे सांगतायेत का?’

‘देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करू शकतात.. कुठे जाऊ शकतात.. कितवर जाऊ शकतात.. या सगळ्यासंबंधीची ही स्थिती आहे.’ असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमधील आरोप-प्रत्यारोप हे यापुढे देखील सुरुच राहतील असंच चित्र आता दिसतं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT