‘त्या 16 आमदारांचा निकाल…’, अजित पवारांच्या विधानाने उंचावल्या भुवया
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. 16 आमदांराचा वेगळा निकाल लागणारच नाही, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना निर्णय घ्यायचा आहे.त्यामुळे आज ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनात जाऊन हा निर्णय तातडीने घेण्यासाठी निवेदन दिले होते.याच आमदारांच्या अपात्रतेवर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 आमदांराचा वेगळा निकाल लागणारच नाही, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या 16 आमदारांचा वेगळा निकाल लागणारच नाही. आणि जर वेगळा निकाल लागला तरी देखील बहुमतावर कुठलाही परिणाम होत नाही. 288 मधून 16 गेले तरी त्यांच्याकडे 272 आमदार राहतात. त्यामुळे बहुमत आहे. फार काही परिणाम होणार नाही, असे मला वाटतेय, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. तसेच आज ठाकरे गट आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घेण्यासाठी विधान भवनात गेले होते.मात्र राहुल नार्वेकर परदेशी दौऱ्यावर असल्याने विधानसभा उपाध्यक्षांना नरहरी झिरवळ यांना निवेदन द्यावे लागले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
हे ही वाचा : संजय राऊत ‘तसं’ बोलून फसले! राणेंसारखी पुन्हा ‘जेल’वारी घडणार?
मध्यावधी निवडणूकीवर काय म्हणाले?
मध्यावधी निवडणूका लागू शकते अशी चर्चा सुरु झाल्याचे माझ्याही कानावर आले आहे, परंतू माझे स्वत:चे स्पष्ट मत आहे, 288 पैकी यदाकदाचित 16 चा वेगळा निकाल लागणार नाही.आणि जर वेगळा निकाल लागला तरी देखील बहुमतावर कुठलाही परिणाम होत नाही. मविआतील जागावाटपावर अजित पवार म्हणाले की, मविआतील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जागावाटपसाठी तिन्ही पक्ष नावे देतील. तिन्ही पक्ष दोन नावे देतील.मग हे 6 लोक जागा वाटपाबाबत चर्चा करतील, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ठाकरे गटाचे उपाध्यक्षांना निवेदन
शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाची प्रत जोडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विधानभवनात जाऊन दिल्याची माहिती ठाकरे गटाच्या आमदारांनी दिली. विधानसभा अध्यक्ष अनुपस्थितीत असल्याने उपाध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनात आल्यानंतर लवकरच त्यांना सुद्धा पुन्हा एकदा विधानभवनात येऊन आमदारांच्या अपात्रते संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल,असं सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा : …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT