Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

shivsena (ubt), shiv sena, uddhav thackeray, devendra fadnavis
shivsena (ubt), shiv sena, uddhav thackeray, devendra fadnavis
social share
google news

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : देवेंद्रजी, तुमची परिस्थिती हलाखीची आहे. तुमची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून पलटवार केला. वरळीतील एनएससीआय डोम येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेचे बाण डागले. (Uddhav Thackeray Hits out at Devendra Fadnavis)

मुंबईतील राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले, “उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला वर्षभर होईल. त्यानंतर जी लोक भेटताहेत आणि मला सांगताहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत.”

हेही वाचा >> ‘शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलेलं, फडणवीसांना माहितीही नव्हतं’, कोणी केला गौप्यस्फोट?

पुढे बोलताना उद्धव ठाकरें म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारला की, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा गाळला. उद्धव ठाकरेंचं मत काय? पहिलं तर देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे हो. तुम्ही बोलताय हे ठिक आहे. पूर्वी जाहिरात यायची की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्रजी तुमचं मत काय? फडणवीसांना ठाकरेंचा सवाल

याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “जे काही अपमान होताहेत ते सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. करणार काय, कारण वरून आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याबद्दल शिवसेना निषेध करतेच. पण, ज्या सावरकरांनी आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी यातना भोगल्या. सावरकरांनी यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केलं, तो देश ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात काडीचाही संबंध नव्हता. अशी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते त्याबद्दल तुमचं मत काय?”, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >> आदित्य ठाकरेंनी वाचली यादी, राज्यव्यापी मेळाव्यात एकनाथ शिंदेंना घेरलं

“सावरकरांनी त्या फडणवीस आणि मोदींसाठी यातना भोगल्या का? फडणवीसांना सांगतोय, जर तुम्ही सावरकरप्रेमी असाल, तर तुमच्या वर जे बसलेत ना… (संजय राऊतांनी सांगितलं की, आमचा एकच बाप आहे, तुमचे किती तुम्हालाच माहिती) मध्यतंरी जाहिरात आलेली, त्यात बापच बदलेला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे फोटो. सावरकरप्रेमी असाल, तर देश आपल्या बुडाखाली घेणाऱ्या नेत्याचा धिक्कार करा. हिंमत असेल, तर करून दाखवा”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं.

ADVERTISEMENT

हात जागेवर ठेवू नका, ठाकरेंचा इशारा

“आयोध्या पौळवर शाईफेक झाली. याआधी ठाण्यात शिंदे नावाच्या कार्यकर्तीला मारहाण झाली. महिला गुंड तयार झाल्या. पण, यापुढे जर माझ्या भगिनीवर हात उठला तर तो हात जागेवर ठेवू नका. अन्याय आम्ही करणार नाही, पण अन्याय करणारा हात जागेवर ठेवणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT