‘देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक’, उद्धव ठाकरेंनी ऑडिओ क्लिपच लावली!

योगेश पांडे

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticizes dcm devendra fadnavis on nagpur maharashtra politics
uddhav thackeray criticizes dcm devendra fadnavis on nagpur maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political latest News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यातूनच जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासोबत देवेंद्र फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी झाल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. (uddhav thackeray criticizes dcm devendra fadnavis on nagpur maharashtra politics)

देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आपले माननीय उप मुख्यमंत्री आहेत, त्यांची अवस्था आता विचित्रच झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झालंय काय नाही, काहीतरी झालंय नक्की पण सांगण्यासारखं नाही,अशी खिल्ली ठाकरेंनी उडवत फडणवीसांची एक ऑडीओ क्लिपच सभेत ऐकवली. या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस ”एकवेळ अविवाहित राहणे पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही”, असे म्हणताना दिसले. ही क्लिप वाजवून ठाकरेंनी जनतेला फडणवीसांच्या त्या भूमिकेची आठवण करून दिली.तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता.त्या सगळ्या भ्रष्टाचारांना बदनाम करायचं, आरोप करायचा, त्यांच्यामागे यंत्रणा लावायचा आणि दहशतीच्या वातावरण निर्माण करायचं आणि नंतर त्यांनाच भाजपात घेऊन मंत्री करायचं अशी टीका देखील ठाकरे यांनी भाजपवर केली.

हे ही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा हट्ट, शिंदेंसाठी इकडे आड तिकडे… खातेवाटपाचं घोडं ‘इथे’ अडलंय!

तुम्ही भगवा झेंड्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलात. हिंदुत्वाशी आणि प्रभू रामचंद्राशी गद्दारी केली.आमचा धनुष्य बाण उचलून तुम्ही गद्दारांना दिलात, त्या प्रभू रामचंद्राशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी तुम्ही गद्दारी केली आहे,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. तसेच आमचं हिंदुत्व साफ आहे,स्वच्छ आहे. गद्दारीला आमच्या हिंदुत्वात स्थान नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मिंधे’ शेपूट घालून बसलेत

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील टीका केली. कोश्यारींचे पार्सल गेले ते बरं झाले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, तरी मिंधे शेपूट घालून बसलेच आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.ज्या योजना आपण जाहिर केल्या होत्या…हिंदुहृदयसम्राट आपला दवाखाना, त्याच्यावरती स्वत:चे फोटो लावले, आता तिसरा फोटो छापणार, पण खरंच त्या दवाखन्यात जाऊन पाहावे लागेल रूग्णांचा सेवा मिळतेय का?असा सवाल देखील ठाकरेंनी केला. बाळासाहेबांचे विचार मी सोडले, म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन हे मिंधे सत्तेसाठी चाटत चाटत, रांगत रांगत तिकडे गेले,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर करत, ते मुख्यमंत्री असताना शिवसेनेची शाखा तोडली, बाळासाहेबांचा, शिवाजी महाराजांच्या फोटोवर हातोडे मारले गेले, आपल्या दैवताच्या फोटोवर हातोडे हे मान्य आहे तुम्हाला,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.

हे ही वाचा : Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या ‘रिटायरमेंट’चा इतिहास नेमका आहे तरी काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT