Mumbai: ‘पोरगा झाला, माझ्यामुळेच झाला’, फडणवीसांच्या ठाकरेंना कानपिचक्या

मुंबई तक

Devendra Fadnavis । Uddhav Thackeray। eknath shinde। Mumbai Projects : मुंबईतील विविध 320 विकासकामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. मुंबईतील विकास कामांचं श्रेय घेण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार आल्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Devendra Fadnavis । Uddhav Thackeray। eknath shinde। Mumbai Projects : मुंबईतील विविध 320 विकासकामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. मुंबईतील विकास कामांचं श्रेय घेण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना असे आदेश दिले की, मुंबईत परिवर्तन झालं पाहिजे. आपण म्हणतो की, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. खूप संसाधने आहेत, बँक बॅलन्स आहे. पण महापालिका ही काही बँकेत पैसे गुंतवून त्याच्या व्याजावर जगण्यासाठी निर्माण झालेली नाही. महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणाकरिता वापरण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे जनतेचा पैसा जनतेकरिता तुम्ही लावा, असं स्पष्ट निर्देश दिले. सातत्यानं मुंबईतील समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला.”

“पावसाळ्यात तीन ते चार महिन्यात माध्यमांत मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांची चर्चा असते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे, 25-25 वर्ष महापालिकेवर राज्य केल्यानंतर साधे रस्ते नीट करता येत नाही. कारण रस्ते चांगले करण्याचा उद्देशच नव्हता. खड्डे बुजवायचे, डांबर टाकायचं. पुन्हा तेच खड्डे बुजवायचे. वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि तरी जनतेला दरवर्षी खड्ड्यांमध्ये टाकायचं ही निती पुर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“युद्धाला तोंड फुटेल”, संजय राऊतांचा अमित शाह-नरेंद्र मोदींवर हल्ला

हे वाचलं का?

    follow whatsapp