Karnataka Election Result : मोदी-शाहांचा उल्लेख, उद्धव ठाकरे म्हणाले…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणूक निकालावर भाष्य करताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
Karnataka assembly election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटकात सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर काँग्रेसला स्पष्ट जनादेश मिळाला. या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
ADVERTISEMENT
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सत्तेचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं अभिनंदन केलं.
हेही वाचा >> Karnataka election results live : भाजपची दक्षिणेतील सत्ता गेली, काँग्रेसला ‘जनादेश’
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन.
हे वाचलं का?
मोदी-शाहांच्या सत्तेचं जोखड फेकून दिलं -उद्धव ठाकरे
“कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> Karnataka: ‘फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..’, शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं!
“कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन”, असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
ADVERTISEMENT
कर्नाटकात काँग्रेस ठरली किंग, भाजप विरोधी बाकांवर
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसला तब्बल 136 जागा (108 जिंकल्या, 29 जागांवर आघाडीवर) मिळाल्या, तर भाजपला 64 (50 जागा जिंकल्या, 14 जागांवर आघाडीवर) जागा मिळाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे
किंग मेकर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं, त्या जेडीएसला 20 जागा (16 जिंकल्या, 4 ठिकाणी आघाडीवर) मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटका पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT