Karnataka: 'फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..', शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं! - Mumbai Tak - nationalist congress president sharad pawar strongly criticized the bjp after the karnataka elections - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Karnataka: ‘फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..’, शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं!

Karnataka Elections Result: कर्नाटक निवडणूक निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला असून शरद पवार यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पण त्याचसोबत त्यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
nationalist congress president sharad pawar strongly criticized the bjp after the karnataka elections

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Vidhansabha Elections) भाजपला (BJP) आपली सत्ता गमवावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला (Congress) एकहाती सत्ता दिली आहे. याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना भाजपच्या एकूण राजकारणावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. कर्नाटकच्या जनतेने फोडाफोडी आणि खोक्याच्या राजकारणाला योग्य उत्तर दिलं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. (nationalist congress president sharad pawar strongly criticized the bjp after the karnataka elections)

‘फोडाफोडी, खोक्याचं राजकारण लोकांना पसंत नाही’

‘कर्नाटकात पहिले जे सरकार होतं ते सरकार लोक फोडून तिथे घालवलं गेलं. जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलं तेच त्यांनी तिथे केलं होतं. तेच मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं तिथेही आमदार फोडलं आणि ते राज्य हातात घेतलं. गोव्यात सुद्धा भाजपचं बहुमत नव्हतं पण तिथेही आमदार फोडलं आणि राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन, संपत्तीचा वापर करून अलीकडे देशात केला जात आहे. ही चिंताजनक गोष्ट आहे.’

‘पण दुसरी त्याला बाजू अशी आहे की, फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण हे या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे.’ अशा बोचऱ्या शब्दात शरद पवार यांनी भाजपचा समाचार घेतला.

कर्नाटकाच्या निवडणूक निकालाबाबत काय म्हणाले शरद पवार?

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कर्नाटकात शक्तीशाली पक्ष आहे अशी काही स्थिती नाही. पण आम्ही एक प्रयत्न केला. 7 उमेदवार उभे करून. खरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये एका उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. तिथे काही निर्णय मिळतील अशी अपेक्षा केली होती. तो मतदारसंघ म्हणजे निपाणीचा मतदारसंघ. आतापर्यंतची जी आकडेवारी दिसतेय पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, आता तो दुसऱ्या स्थानी गेला आहे. सध्या मतांचं अंतर हे 6000 आहे. त्यामुळे आता तिथे यश नक्की मिळेल अशी खात्री देता येत नाही. पण एखाद्या राज्यात एंट्री करायची असेल तर ती एंट्री करण्याच्या दृष्टीने आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.’

‘मला एका गोष्टीचा आनंद आहे की, मी गेल्या काही दिवसात जाहीरपणे बोलत होतो की, कर्नाटकात भाजपचा पराभव होईल. त्यांचं सरकार जरी असलं आणि देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक सभा घेतल्या तरी तिथल्या जनतेचा रस जो आहे तो मतातून व्यक्त होईल अशी खात्री आम्हाला होती. दोन-तीन गोष्टी आहेत..’

‘एक अलीकडच्या काळात केंद्र सरकारकडून विशेषत: भाजपकडून.. जिथे त्यांचं राज्य नाही आणि इतरांचं राज्य आहे ते तिथले आमदार फोडून तिथलं राज्य मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरलं. कर्नाटकात देखील तीच अवस्था केली. कर्नाटकात पहिले जे सरकार होतं ते सरकार लोक फोडून तिथे घालवलं गेलं. जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलं तेच त्यांनी तिथे केलं होतं.’

‘तेच मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं तिथेही आमदार फोडलं आणि ते राज्य हातात घेतलं. गोव्यात सुद्धा भाजपचं बहुमत नव्हतं पण तिथेही आमदार फोडलं आणि राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन, संपत्तीचा वापर करून अलीकडे देशात केला जात आहे. ही चिंताजनक गोष्ट आहे.’

हे ही वाचा >> Karnataka election results live : काँग्रेस ‘किंग’! कर्नाटक भाजपच्या हातून निसटणार

‘पण दुसरी त्याला बाजू अशी आहे की, फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण हे या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे.’

‘कर्नाटकात सध्या भाजपला जो कल आहे तो साधारण 65 ठिकाणी आहे. तर काँग्रेस 133 ठिकाणी आहे. याचा अर्थ काँग्रेस भाजपला कल असलेल्या जागांपेक्षा दुप्पट जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेने घेतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे सत्तेचा गैरवापर..’

‘मी कर्नाटकच्या जनतेचं, काँग्रेस पक्षाचं अभिनंदन करतो. देशात ज्या चुकीचं वातावरण करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत. त्यांना एक प्रकारचा धडा शिकवला आणि आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल.’

हे ही वाचा >> समीर वानखेडेवर छापा पडताच शाहरुख खानचं ‘ते’ ट्विट होतंय प्रचंड व्हायरल

‘केरळमध्ये भाजपचं राज्य नाही, तामिळनाडूत नाही.. कर्नाटकात नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये.. वर राज्यस्थानमध्ये नाही.. दिल्ली, झारखंड, पंजाब, छत्तीसगड, बिहारमध्ये नाही, प. बंगालमध्ये नाही. याचा अर्थ बहुसंख्य राज्यामध्ये भाजप हे सत्तेच्या बाहेर जात आहेत. त्यामुळे आत्ताचा हा निकाल आहे.’

‘2024 साली देशात ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीत काय चित्र येणार आहे याचा एक नक्की अंदाज या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म… Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास! तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण… परिणीती, कियारा, आलिया… लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक! राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं? Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo भारतातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे! कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन… जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो? सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर… डोक्यावर फेटा, काळा चष्मा… राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक! 6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला ‘तो’ विक्रम! Premanand Maharaj : ‘या’ 2 गोष्टी करा… विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस! Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही? Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो? Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं? Alibaug मधील ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर! तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचे स्पीड कमी झाले असेल तर हे पर्याय निवडा घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी…