“सोन्याचे खोके, नवी फडणविशी” , ठाकरेंचे मोदी-शांहावर ‘बाण’, काय म्हटलंय?
Dasara 2023 : सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. रावणाकडेही सोन्याचे खोके होते, असं म्हणत शिंदेंना डिवचण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Saamana editorial : शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याआधीच सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजप बाण डागण्यात आलेत. ‘अहंकाराचा नाश होईल’, या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून ठाकरे गटाने रावणाकडेही सोन्याचे खोके होते म्हणत शिंदेंना डिवचलं आहे. तर राज्यात उघडीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटवरून देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. (Uddhav Thackery attacks On eknath shinde, Devendra Fadnavis)
ADVERTISEMENT
अग्रलेखाच्या सुरुवातीलाच “श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तोच हा दिवस. भगवान रामाने रावणाचा वध करण्यासाठी चंडी देवीची पूजा केली. ती चंडी म्हणजे दुर्गा. रामाने युद्ध जिंकले म्हणजेच रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्याचा अभिमान मोडला. रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत हेच खरे दसऱ्याचे महत्त्व आहे”, असे म्हणत ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे.
“तुमची गजर नाही…”
“राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवरात्रीच्या उत्सवांना गेले व म्हणाले, ‘‘या देशातील बच्चा बच्चा श्रीराम म्हणेल!’’ देवेंद्रजी, या देशातील बच्चा बच्चा श्रीरामाचा गजर करीलच, त्यासाठी तुमची गरज नाही, पण अमली पदार्थांचा ‘रावण’ या तरुणांचा नाश करीत आहे. त्या रावणाचा वध तुम्ही का करीत नाही?”, असा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
समजून घ्या >> Maratha Reservation देणे खरंच शक्य आहे का?
महाराष्ट्रात नवी फडणविशी… शिवसेनेने (UBT) काय म्हटलंय?
“मराठा, धनगर समाजाची ‘आरक्षण’ आंदोलने त्याच वैफल्यातून खदखदत आहेत. महाराष्ट्र कधी नव्हे इतका जातीपातीत फाटला आहे. मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, स्पृश्य-अस्पृश्य असे भेदाभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले व ते विचार कृतीत उतरवले; पण आज मराठा विरुद्ध धनगर, ओबीसी, दलित असे सगळेच एकमेकांविरुद्ध मांड्यांवर थाप मारून उभे ठाकले. महाराष्ट्राचे पुरोगामित्व, एकजिनसीपणा यामुळे संपला. महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचे काम 2014 पासून सुरू झाले. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून शिवसेना तोडली गेली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला गेला व मिंध्या-लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपने नवी फडणविशी सुरू केली”, अशा शब्दात ठाकरेंच्या सेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘एकदा होऊनच जाऊ द्या…’, अजित पवारांची प्रचंड मोठी मागणी, भाजपलाच गाठलं खिंडीत?
“महाराष्ट्रात फसवाफसवी आणि राजकीय दरोडेखोरीचे प्रकार राजरोस सुरू आहेत. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शाहांनी लादले आहे. हे बेकायदेशीर सरकार वर्षभर महाराष्ट्राच्या बोकांडी बसले आहे व त्यांना संरक्षण देण्याचे काम भाजपचे दिल्लीश्वर आणि महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा मानायला हे तयार नाहीत.”
जनतेने वाघनखे चढवली आहेत…
“सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे. घटनाबाह्य, अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर ‘राम-लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल. पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्रे काढली. तोच आजचा दिवस. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘वाघनखे’ चढवली आहेत.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT