Vidhan Parishad Election : ठाकरेंचे दोन उमेदवार ठरले! शिवसेनेकडून (UBT) नावे जाहीर
Maharashtra Politics Latest News : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा करत ठाकरेंनी आघाडी घेतली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधान परिषद निवडणूक २०२४
अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नावांची घोषणा
Vidhan Parishad Election 2024 : जुलै २०२४ मध्ये रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश असून, दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करत ठाकरेंनी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. शिवसेनेने अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. (Shiv Sena UBT Announces Candidates name for Vidhan parishad Election)
ADVERTISEMENT
मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघात निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, २६ जून रोजी मतदान होणार असून, निकाल म्हणजे मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी केली जाणार आहे.
अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी
विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, दोन जागांसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> "...तर भाजपला फायदा झाला असता", नेमका मुद्दा काय?
शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करणारे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.
अनिल परब हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!
अनिल परब हे २०१२ आणि २०१८ असे सलग दोन वेळा विधान परिषदेत निवडून गेले आहेत. त्यांना ठाकरेंकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अनिल परब यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. त्यांना ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
ADVERTISEMENT
ज.मो. अभ्यंकर कोण आहेत?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेशी सलग्न असलेल्या शिक्षक सेनेचे अभ्यंकर हे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षैत्रात ते अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT