‘तेव्हा दुतोंडी साप जहर का ओकत होते?’, फडणवीसांना शिवसेनेचा (UBT) सवाल

मुंबई तक

अजित पवार यांच्यासोबत आघाडी केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

maharashtra politics : uddhav thackeray targets devendra fadnavis and eknath shinde.
maharashtra politics : uddhav thackeray targets devendra fadnavis and eknath shinde.
social share
google news

Maharashtra politics : अजित पवारांसोबत केलेली युती अधर्म नव्हे तर कुटनीती असल्याचे विधान उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या याच विधानावरून शिवसेनेने (UBT) एक काही प्रश्न विचारले आहेत. ‘बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे!’, या अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांबरोबरच शिंदेंवरही बाण डागले आहेत.

शिवसेनेने म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित्त तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनःशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे.”

‘फडणवीसांनी सत्य-नीतिमत्तेची कास सोडली’

“फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे, अधर्म नव्हे.’ भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मिंधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे”, असा चिमटा अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांना काढला आहे.

वाचा >> 8 जणांकडून सामूहिक बलात्कार: महिलेचा यू-टर्न, पोलिसांनी लावला डोक्याला हात, काय घडलं?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर बोट ठेवत शिवसेनेने (UBT) म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मिंध्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केले व सांगितले, ‘राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झालो हे आपले बेरजेचे राजकारण आहे.’ शिंदे-फडणवीस या जोडीचे डोके ठिकाणावर नाही व दोघांना ठाण्यातल्या मानसोपचार इस्पितळातील उपचाराची गरज आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp