Vijay Wadettiwar : “कटोरा हात मैं लेकर, बाबा के नाम दे”, वडेट्टीवार भुजबळांवर कडाडले
Vijay Wadettiwar chhagan bhujbal : छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. भुजबळांनी मांडलेल्या भूमिकेवरच आक्षेप घेत विजय वडेट्टीवारांनी खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal Vijay Wadettiwar : विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. यात छगन भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली. भुजबळांनी मांडलेल्या भूमिकेचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. भुजबळांच्या भाषणातील मुद्द्यांवर बोट ठेवत वडेट्टीवारांनी भुजबळांना सुनावलं.
विधानसभेत विजय वडेट्टीवार भुजबळांबद्दल काय बोलले?
“काल बोलले भुजबळ. भुजबळांना थोडं समजायला पाहिजे. तिकडे बसून न्याय निवाडा करायचा. महाराष्ट्रापुढे सांगायचं छाती फोडून. आता तर ते काढायचंच राहिलं. आतमध्ये काय निघतं काही दिवसांनी समजेल. अशी फाडा आणि बघा माझ्या छातीत काय दडलं आहे. काही दिवसांनी दिसेल. पण, ते चाललंय पुढे काय दिसणार… कुणाची छबी दिसेल. आम्ही वाट पाहतोय”, असा टोला वडेट्टीवारांनी भुजबळांना लगावला.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरे-PM मोदी आज एकत्र असते, पण राऊतांनी शरद पवारांना…”
“तिथे बसून (सत्ताधारी बाकावर). आम्ही तिथे होतो. कोरोना काळाता सात महिने काम करायला मिळालं. तुम्ही पण काही चांगले निर्णय घेतले. त्यावेळी हे महोदय अजिबात बोलत नव्हते. शांत होते. काहीच करत नव्हते. मी राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो. मी सांगितलं मला पर्वा नाही. आज मात्र काय मिळत नाही”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी भुजबळांना सुनावले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “काय बोलले भाषणात? भाषण वाचून दाखवू… सारथी, बार्टीसारखे ओबीसींचे प्रश्न सोडवा. हे खरं आहे. बोललेत, पण इथे बोलून काय… सावे साहेब, तुमच्या कानात सांगायला पाहिजे. जोराने बोलता येत नाही, तर हळू बोला. हे जमवा ना, करा ना. सारथीला पैसे दिले, तुम्ही आम्हाला देत नाही. महाज्योतीला देत नाही.”