Vishnu Deo Sai : छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरला! माजी केंद्रीय मंत्र्याकडे राज्याची सूत्रे

भागवत हिरेकर

छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण होणार, या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांची निवड करण्यात आली आहे. ते कोण आहेत, हे जाणून घ्या…

ADVERTISEMENT

Vishnu deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh.
Vishnu deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh.
google news

Vishnu Deo Sai Chhattisgarh chief minister : भाजपची सत्ता आलेल्या तीनपैकी एका राज्यातील सस्पेन्स संपला. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने नावावर शिक्कामोर्तंब केले. माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने मोठा डाव चालत एका आदिवासी नेत्याला राज्याचा चेहरा बनवले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, असे सूत्रांनी सांगितले. (Vishnu deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh)

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षक सकाळी नऊच्या सुमारास रायपूरला पोहोचले. दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नावासंदर्भात आमदारांसोबत विचारमंथन सुरू झाले होते.

भाजपने आदिवासी नेत्याकडे दिली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय झाल्यानंतर, याला दिल्लीतून मंजुरी मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजप आदिवासी नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री करेल अशी अटकळ होती. महिला नेत्यालाही संधी मिळू शकते, असेही बोलले जात होते. कारण यावेळी भाजपने निवडणूक पार पडलेल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर केला नव्हता.

हे वाचलं का?