Waman Mhatre: वामन म्हात्रेंना अटक होणार? कोर्टाचा दणका; नेमकं प्रकरण काय?
Waman Mhatre Anticipatory bail rejected : बदलापूरमधील एका शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नागरीकांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करत असताना वामन म्हात्रे यांनी एका महिला रिपोर्टर विरोधात अश्लाघ्य भाषा वापरती होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या अडचणी वाढणार
वामन म्हात्रे यांना कल्याण कोर्टाचा दणका
कल्याण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला
Waman Mhatre Anticipatory bail rejected :बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलनादरम्यान एका महिला पत्रकाराबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर वामन म्हात्रे (Waman Mhatre) यांनी अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात (Kalyan Court) धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली लावली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वामन म्हात्रे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (waman mhatre kalyan court rejected anticipatory bail journalist abusing case badalapur school case protest)
ADVERTISEMENT
बदलापूरमधील एका शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नागरीकांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करत असताना वामन म्हात्रे यांनी एका महिला रिपोर्टर विरोधात अश्लाघ्य भाषा वापरती होती. त्यानंतर संबंधित महिला पत्रकाराने म्हात्रे यांच्यावर अत्याचार आणि विनयभंगाचा आरोप केला होता. मात्र, म्हात्रे यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Aadhar Link: पैसे मिळाले नाही तर करा 'या' गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.
या प्रकरणात आता न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना झटका दिला आहे. याप्रकरणी म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कल्याण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी पोलीस वामन म्हात्रे यांना अटक करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हे वाचलं का?
प्रकरण काय?
सकाळची एक महिला पत्रकार बदलापूर अत्याचार प्रकरणाच वार्ताकन करत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदेच्या सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'' अशी अर्वाच्च भाषा वापरली होती. या प्रकरणी आता महिला पत्रकाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. वामन म्हात्रे यांच्या या विधानानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता कोर्टाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे.
हे ही वाचा : Kavita Raut : ''जातीमुळे शासकीय नोकरीपासून वंचित ठेवलं'', आंतरराष्ट्रीय धावपटूचा सरकारवर गंभीर आरोप
वामन म्हात्रे काय म्हणाले?
'मोहिनी जाधवला मी आव्हान केलं होतं कालच.. की तिने तिच्या आई-बापाची शपथ घेऊन सांगायचं की वामन म्हात्रे असं बोलला.. खरं तर ज्या पीडित मुलीला न्याय मिळून द्यायचं काम आम्ही सर्व बदलापूरवासी करत होतो. त्यात आघाडीवर होते.'
ADVERTISEMENT
'मोहिनी जरी पत्रकार असेल तरी ती मीनल मोरे, संगीता चेंदवणकर असेल.. अशा 4-5 जणींचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपने एक आवाहन केलं होतं की, आपण शालेय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू. ते आंदोलन करणं बाजूलाच राहिलं या ठिकाणी बाहेरचे आंदोलक आले आणि त्याठिकाणी दंगलीचं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला, असे वामन म्हात्रे महिला पत्रकाराच्या आरोपावर म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT