NCP: 'आमचं आता फाटलंय, पण लोकांना वाटतं...', अजित पवार 'हे' काय बोलून गेले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

अजित पवारांचं मोठं विधान
अजित पवारांचं मोठं विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांचं मोठं विधान

point

शरद पवारांपासून फारकत घेतल्याचं केलं स्पष्ट

point

शिरूरमध्ये अजितदादांनी स्पष्ट

Ajit Pawar and Sharad Pawar: शिरूर: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसं राजकारण अधिक तापू लागलं आहे. त्यातही मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण तर पूर्णपणे बदलून गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट यांना राजकीय पंडितांना देखील बुचकळ्यात टाकलं आहे. अनेकांना असंही वाटतं की, पक्षात पडलेली ही फूट तात्पुरती आहे.. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तरी.. पण आता याबाबत स्वत: अजित पवारांनीच आज थेट सांगितलंय.. आमचं आता फाटलंय... 

मागील वर्षी जून महिन्यातच काही आमदारांना सोबत घेत अजित पवार हे थेट सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. जो निवडणूक आयोगाने मान्यही केला. पण असं असलं तरीही अद्यापही अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरूच असते. 

हे ही वाचा>> ठाकरेंनी मागितला 'हा' मतदारसंघ; अन् MVA मध्ये मोठा...

त्याला कारण देखील तसंच आहे.. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या 72 तासात अजित पवार हे शरद पवारांकडे परत आले होते. त्यामुळे आता देखील पुन्हा कधी ना कधी अजित पवार माघारी फिरतील असं अनेकांना वाटतं. पण आता तसं काहीही होणार नाही असं स्पष्टपणे स्वत: अजित पवार यांनी सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'आता आमचं फाटलंय...', अजित पवार नेमकं काय म्हणाले.. 

शिरूरमध्ये आयोजित एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'तुम्ही मनामध्ये वेगळी भावना आणू नका.. आता सरळसरळ फाटी (फूट) पडलीय.. आपण इकडच्या फाटीला (एका बाजूला) आहोत ते तिकडच्या फाटीला (दुसऱ्या बाजूला) आहेत. त्यामुळे काही जण म्हणतायेत.. कधीतरी हे एकत्र येतील कारे हे?' 

 

'यानेच आमचं निम्मं गार होतेय... सारखं.. हळूच मला दबकत.. दबकत मला म्हणतं दादा.. दादा.. पुढं काय तरी होईल का? म्हणजे अजूनही लोकांच्या मनात तशा प्रकारची शंका आहे..' असं विधान अजित पवारांनी यावेळी केलं आहे. 

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलानंतरही काही वेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काही तरी शिजतंय अशी विधानं राजकीय वर्तुळात सातत्याने होत होती.

हे ही वाचा>> 'तुम्हाला खोके नव्हे,कंटेनर लागतात', शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

या सगळ्यामुळेच आता देखील त्याच पद्धतीने पाहत आहेत. म्हणूनच अजित पवार यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की, आमचं फाटलंय... पण राजकारणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे आता अजित पवारांचं हे विधान कितीपत योग्य ठरणा हे पाहणंही महत्त्वाचं आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT