Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!
This time the BJP has a challenge to win the battle of power for the third time in a row and for this the strategy of the party has become almost clear. which are the main issues that will dominate the BJP’s election campaign.
ADVERTISEMENT

bjp strategy for 2024 : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि नवीन विरोधी पक्षांची आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) कामाला लागलेत. भाजपसमोर सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे आव्हान असणार आहे. त्यासाठी भाजपची रणनीती जवळपास स्पष्ट झाली आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे प्रामुख्याने असतील…हे समजून घेऊ. (What is BJP’s plan for lok sabha election 2024?)
1) हिंदुत्व
भाजपने हिंदुत्वाचे राजकारण अशा पद्धतीने देशात प्रस्थापित केले आहे की, आता धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांमध्येही भाजपपेक्षा मोठी रेषा ओढण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा सर्वाधिक ठळक असणार हे उघड आहे. राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राटाची प्रतिमा निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची दुसरी पुण्यतिथी भाजपने हिंदू अभिमान दिन म्हणून साजरी केली. यातून भाजपने त्याच्या राजकारणाला हिंदुत्वाच्या राजकारणाला धार देत असल्याचे निवडणुकीआधीच स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.
2) अयोध्या-मथुरा-काशी
2024 च्या निवडणुकीपूर्वी अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होणार आहे. शतकानुशतके चाललेला जुना वाद हिंदूंच्या बाजूने मिटवण्याचे आणि मंदिर बांधण्याचे संपूर्ण श्रेय भाजपने घेतले आहे. निवडणुकीपूर्वी हे मंदिर पूर्ण झाल्यास भाजप आपले अनेक दशके जुने आश्वासन पूर्ण करेल. काशीतील बाबा विश्वनाथ विशाल कॉरिडॉर आधीच देश आणि जगाला आकर्षित करत आहे.
मथुरेतही मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत आणि ती सुरू आहेत. यासोबतच मथुरेतील जन्मभूमी आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीबाबतही कोर्टात कार्यवाही सुरू असल्याने हिंदू मतदारांमध्ये याची चर्चा सुरू आहे. याचाच फायदा घेण्यासाठी ही निवडणूक भाजपसाठी संधीच असणार आहे.