Fadnavis घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स, हे कुठलं हिंदूत्व?: रुपाली ठोंबरे
NCP leader Rupali Thombare has criticized Fadnavis by taunting him: पुणे: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Poll) मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. असं असताना देखील उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी (ravindra dhangekar) तर भाजप (BJP) नेते पोलिसांसमोर पैसे वाटप करत असल्याचा थेट आरोप करत उपोषणाचा मार्ग […]
ADVERTISEMENT
NCP leader Rupali Thombare has criticized Fadnavis by taunting him: पुणे: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Poll) मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. असं असताना देखील उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी (ravindra dhangekar) तर भाजप (BJP) नेते पोलिसांसमोर पैसे वाटप करत असल्याचा थेट आरोप करत उपोषणाचा मार्ग पत्करला याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी कसब्यात येऊन धंगेकरांना आपला पाठिंबा दिला. तसंच रूपाली ठोंबरेंनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अतिशय बोचऱ्या शब्दात टीका देखील केली. (what kind of hinduism is it to dance with our muslim brother in the house rupali thombare criticized fadnavis)
ADVERTISEMENT
‘तुम्ही लोकांना हिंदूत्व शिकवतात आणि घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स करता हे कुठलं हिंदूत्व आहे? म्हणजे तुम्ही आमच्या लोकांची माथी भडकवता.’ अशा शब्दात रुपाली ठोंबरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.
रुपाली ठोंबरेंनी अशी टीका का केली?
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्या टिकटॉक स्टार रियाज अली (Riyaz Aly)डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या.
हे वाचलं का?
अमृता फडणवीसांचं ‘मैं मुड बनालिया है’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर रियाज अलीने अमृता फडणवीस यांच्या याच गाण्यावर त्यांच्यासोबत डान्स करत रिल तयार केला होता. या सोबतच रियाजने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. तसेच त्याने अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांचे घरी बोलवल्याबद्दल आभारही मानले आहेत.
कसबा पोटनिवडणूक: पैसे वाटल्याचा Video व्हायरल, मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ड्रामा
यावेळी रियाजने देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. याच मुद्द्यावरुन रुपाली ठोंबरे यांनी मुंबई Tak सोबत बोलताना फडणवीसांवर आता निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई Tak सोबत बोलताना रूपाली ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या
‘घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स करता हे कुठलं हिंदूत्व?’
ADVERTISEMENT
‘हिंदू-मुस्लिम ऐक्याला ठेच पोहचवणारं हे सरकार आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत येतात तेव्हा तुम्ही जात-पात न पाहता काम केलं पाहिजे. रवींद्र धंगेकर जिथून निवडून येतात तिथे सगळ्या जाती-धर्माची लोकं आहेत. भाजप म्हणतं की कसबा हा आमचा बालेकिल्ला.. पण कसबा हा कोणाची मक्तेदारी नाही.’
‘देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील यांना हिंदुत्वाचं जे काही सांगतात.. तर तुम्ही लोकांना हिंदुत्व शिकवतात आणि घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स करता हे कुठलं हिंदूत्व आहे. हे हिंदूत्व कुठलं आहे. म्हणजे तुम्ही आमच्या लोकांची माथी भडकवता.’ असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा Video व्हायरल, डान्स करणारा ‘तो’ कोण?
‘एकनाथ शिंदेंनी केलेली गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाही’
‘मी लहानपणापासून जी पुस्तकं वाचली आहेत. त्यात म्हटलंय.. सर्व जातीधर्माची लोकं ही आपले भाऊ-बहीण आहेत असं आहे. मग निवडणुकीत तुम्हाला जेव्हा पराभव दिसतो तेव्हा तुम्हाला जाती-जाती तेढ निर्माण करायचं सुचतं का? या सगळ्या गोष्टी भयानक आहेत. आजही सांगते तुम्हाला, ही पोटनिवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे विजयी होतील.
‘एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जी गद्दारी केली आहे ती महाराष्ट्राला पटलेली नाही. त्यामुळे गद्दारांच्या अस्तित्वाचा विषयच येत नाही. तुम्ही जर त्यांची रॅली पाहिली तर त्यात भाजपचे लोक होते. दुसरे सर्वसामान्य लोकं नव्हते.’
‘भाजप जे पैसे वाटतायेत.. त्याबाबत मतदारांना देखील आम्ही विनंती केली आहे की, तो पैसा आपल्या बापाचा आहे, आपल्या कष्टाचा आहे.. तो घ्या आणि मतदान रवींद्र धंगेकरांना करा.. हे सांगितलं आहे.’ असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी अतिशय आक्रमकपणे शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT