Badlapur News: 'मुख्यमंत्री शिंदे कुठे आहेत, त्यांनी इथे यावं...', चिडलेल्या बदलापूरकरांचा प्रचंड संताप

मिथिलेश गुप्ता

Badlapur Thane School case: बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात तब्बल 9 तास आंदोलन सुरू होतं. याचवेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंनी इथे यावं अशी मागणी केली होती.

ADVERTISEMENT

'मुख्यमंत्री शिंदे कुठे आहेत, त्यांनी इथे यावं...'
'मुख्यमंत्री शिंदे कुठे आहेत, त्यांनी इथे यावं...'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर प्रकरणात नागरिक अत्यंत संतप्त

point

लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी

point

मुख्यमंत्री शिंदेंनी बदलापूरला यावं, आंदोलकांचं आवाहन

Badlapur Thane School case Update: बदलापूर: बदलापूरमधील आदर्श विद्यालयात चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून अत्यंत आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं आहे. तब्बल 8 तासांपासून अधिक काळ हे आंदोलन सुरू असून अद्यापही आंदोलक हे ट्रॅकवरून मागे हटण्यास तयार नाहीत. अनेक आंदोलकांनी असाही सवाल केला आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत? त्यांनी इथे यावं.. अशी मागणीही आंदोलकांनी यावेळी केली आहे. (where is chief minister eknath shinde should he come here badlapur protestors are furious over the sexual assault case)

मुख्यमंत्री शिंदेंनी इथे यावं, बदलापूरच्या संतप्त आंदोलकांची मागणी 

नराधम आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथे यावं अशी मागणी केली आहे. याबाबत अनेका आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया दिला आहे. पाहा नेमकं आंदोलक काय-काय म्हणाले. 

'आरोपीला सोडून द्या... आमच्या ताब्यात द्या... रिपोर्ट यायला का उशीर झाला? एकनाथ शिंदे जिथे आहेत त्यांनी इथे यावं. आमची मागणी पूर्ण करावी. आम्ही सकाळपासून विनंती करतोय. एकनाथ शिंदेंनी इथे यावं अशी आमची इच्छा आहे.' 

'वैद्यकीय चाचणीचा अहवाल येण्यास एवढा उशीर का झाला? एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच पडली नसती. पोलिसांच्या दिरंगाईमुळे आज लोकं येथे आले आहेत.'

हे ही वाचा>> Badlapur Thane School case : बदलापूरच्या घटनेवर राज ठाकरेंचं मोठं आवाहन, ''मनसैनिकांनो लक्ष असू द्या...''

'आरोपीला इथल्या इथे फाशी झाली पाहिजे. कारण तुमचा निकाल लागेपर्यंत 2-3 वर्ष जातात. काही होत नाही.. फाशीच आजच झाली पाहिजे.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp