Delhi New CM Atishi : कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी? राजकारणात कशी झाली एन्ट्री?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Delhi New CM Atishi Political History
Who Is Delhi New CM Atishi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अतिशी यांनी कुठे घेतलं शिक्षण?

point

मार्लेना नाव का हटवण्यात आलं?

point

राजकारणात कशी झाली एन्ट्री?

Who Is Delhi New CM Atishi : अतिशी यांचा जन्म 8 जून 1981 ला झाला. त्यांचे आई-वडील दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. विजय सिंग असं त्यांच्या वडिलांचं नाव असून त्यांच्या आईचं नाव तृत्पा सिंग आहे. अतिशी सुरुवातीला त्यांचं नाव अतिशी मार्लेना असं लिहायची. त्यांच्या नावाचीही रंजक कहाणी आहे. रिपोर्टनुसार, अतिशी यांचे वडील मार्क्स आणि लेनिन यांचे चाहते होते. त्यामुळे दोघांच्या नावांना एकत्रित जोडून त्यांच्या नावापुढे 'मार्लेना' जोडण्यात आलं. (Atishi was born on 8 June 1981 in La Jhala. His maternal grandfather was a professor at Delhi University)

मार्लेना नाव का हटवण्यात आलं?

अतिशीने वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या नावामधून मार्लेना हटवलं होतं. यामुळे कोणत्याही प्रकारचा जातीभेद निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. राजकीय पटलावर विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! झटपट जमा होतील 4500 रुपये

अतिशी यांनी कुठे घेतलं शिक्षण?

अतिशी यांनी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेत घेतलं. त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून मास्टर्सची डिग्री घेतली. त्यानंतर चिवनिंग स्कॉलरशिपच्या माध्यमातून ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून त्यांनी दुसरी मास्टर डिग्री केली. आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून अतिशी या पक्षात कार्यरत आहेत. 2013 मध्ये पार्टीने जेव्हा त्यांचा मेनिफेस्टो ड्राफ्ट बनवण्यासाठी कमिटी केली, त्यात अतिशी यांचाही समावेश होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजकारणात कशी झाली एन्ट्री?

अतिशी वर्ष 2015 ते 2018 पर्यंत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदीया यांचा सल्लागार म्हणून काम पाहत होती. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणात उतरल्या. कालकाजी मतदारसंघात आमदार, त्यानंतर आम आदमी पक्षाच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटी म्हणजेच पीएसीची मेंम्बर होती. 2019 मध्ये त्या लोकसभा निवडणुकीतही उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी भाजप नेते गौतम गंभीर यांनी त्यांचा पराभव केला होता. 

हे ही वाचा >> Delhi New CM Net Worth: ना घर, ना जमीन... तरीही करोडपती आहेत दिल्लीच्या नव्या CM अतिशी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. आपच्या नेत्यांनी अतिशी यांची विधिमंडळ नेतेपदी नियुत्ती केली. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदावर कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले होते. आज 12 वाजता आम आदमी पार्टाच्या विधिमंडळातील नवीन नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT