BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
केसीआर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवतायेत. त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाचं दर्शन देखील घेतलं आहे. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या 600 गाड्यांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
ADVERTISEMENT

Who Is KCR : तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहित असेलच. भाषावार प्रांत रचना करण्याचे ठरल्यानंतर भाषेनुसार राज्य स्थापन करण्यात आली. तत्कालिन सरकारने मुंबईला मात्र केंद्रशासित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा होऊ लागली. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
आता तुम्ही म्हणाल ही सगळी कहाणी आम्हाला माहिती आहेच की, पुन्हा का सांगताय. ही कहाणी पुन्हा सांगण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्रासारखाच लढा स्वतंत्र तेलंगणा राज्य मिळावं म्हणून एक नेता लढत होता. अखेर या नेत्याच्या आंदोलनापुढे केंद्राला झुकावं लागलं आणि स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली. या नेत्याचं नाव आहे, कल्वकुंतला चंद्रशेखर राव, ज्यांना देशात केसीआर म्हणून ओळखलं जातं.
महाराष्ट्रात पाऊल रोवण्याचे प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नाका नाक्यावर भलेमोठे फ्लेक्स दिसतायेत. त्या फ्लेक्सवर लिहीलंय ‘अब की मार किसान सरकार’, आता हे फेक्स महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याचे नाहियेत हे फ्लेक्स आहेत, भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे. केसीआर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवतायेत. त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाचं दर्शन देखील घेतलं आहे. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या 600 गाड्यांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रात एवढं मोठं शक्तिप्रदर्शन करणारे केसीआर नेमके कोण आहेत?
के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय प्रवास
कल्वकुंतला चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1954 साली झाला. तेलगु लिट्रेचरमध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री घेतली आहे. 1970 साली युथ काँग्रेसमधून राव यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. पुढे 1983 मध्ये राव रांनी तेलगु देसम पार्टीमध्ये प्रवेश केला. 1985 ते 2004 या काळामध्ये ते आंध्रप्रदेशच्या विधानसभेत आमदार होते. या काळात त्यांनी राज्यमंत्री पद तसेच कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवलं आहे. 1999 ते 2001 या काळात आंध्रप्रदेशच्या विधानसभेचे ते उपाध्यक्ष होते.