लोकसभा निवडणुकीत कोणाला मिळणार संधी? भाजपची पहिली यादी येणार कोणत्याही क्षणी
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha) जवळ आल्या आहेत. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे. प्रत्येकजण पहिल्या यादीची वाट पाहत आहे. गुरुवारी (29 फेब्रुवारी) भाजप हायकमांडमध्ये बैठका सुरू होत्या. विविध राज्यातील नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक जागेवर चर्चा झाली.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha) जवळ आल्या आहेत. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे. प्रत्येकजण पहिल्या यादीची वाट पाहत आहे. गुरुवारी (29 फेब्रुवारी) भाजप हायकमांडमध्ये बैठका सुरू होत्या. विविध राज्यातील नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक जागेवर चर्चा झाली. पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास चालली. सायंकाळी 7 नंतर ही बैठक सुरू झाली. त्यानंतर भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तब्बल ४ तास मॅरेथॉन विचारमंथन झाले. भाजपच्या मुख्यालयात रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत जागांवर चर्चा सुरू होती. (Who will get a chance in the Lok Sabha elections bjp to decide candidate 6 hours marathon meeting in Central Election Committee meeting)
या दोन्ही बैठकीत पहिली यादी अंतिम करण्यासाठी चर्चा झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कमान आपल्या हातात घेतली आहे. गुरुवारी (29 फेब्रुवारी) संध्याकाळी 7 वाजता त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी बराचवेळ बैठक घेतली. त्यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव आणि राज्यांचे नेते येथे उपस्थित होते. या निवडणुकीत पक्ष काही जुन्या नेत्यांची तिकिटं कापतो की उमेदवार निवडीत काही नवीन प्रयोग करतो, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

कमकुवत जागांसाठीचे उमेदवार सर्वात आधी होणार घोषीत?
आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपला उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील 'कमकुवत जागांवर' उमेदवारांची घोषणा करायची आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी संघटना मजबूत करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे पथकही मैदानावर पाठवण्यात आले होते. या जागांवर विजयाची शक्यता वाढल्याचे पक्षाला वाटते. त्यामुळेच ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.