Pankaja Munde : ‘…म्हणून ओबीसी मेळाव्याला गेले नाही’; पंकजा मुंडेंनी केला खुलासा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

pankaja munde why did not attend obc melava
pankaja munde why did not attend obc melava
social share
google news

Pankaja Munde On OBC Rally : जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महासभा पार पडली. सभेच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचाही फोटो होता, पण त्या सभेला उपस्थित नव्हत्या. ओबीसी एल्गार सभेला उपस्थित न राहण्यामागची भूमिका पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली.

पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, “अनेक ओबीसी मेळावे वेगवेगळ्या पक्षांनी आतापर्यंत घेतले आहेत. भाजपनेदेखील ओबीसी मेळावे घेतले, पण हा मेळावा असा होता की, ज्यामध्ये माझा फोटो होता. या मेळाव्याला यावं, अशी समाजातील लोकांची इच्छा होती. हा सर्वपक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाकडून कुणी जावं, याबाबतचा निर्णय राज्यातील पक्षाने घेतला. भाजपकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे हे या कार्यक्रमाला गेले होते”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

हे ही वाचा >> ‘त्यांना आवरा, नसता…’, जरांगेंनी भुजबळांविरुद्ध थोपटले दंड; शिंदे, फडणवीस, पवारांना काय दिला इशारा?

छगन भुजबळांच्या भाषणाचं कौतुक

पंकजा मुंडे याच मुद्द्यावर बोलताना म्हणाल्या की, “बहुजन नेता म्हणून माझा आजपर्यंतचा प्रवास राहिला आहे. माझी सुरुवातीपासूनची भूमिका बघितली तर मराठा आणि ओबीसी समाजातील वाद, संघर्ष कमी होण्याकडे जास्त आहे. कारण समाजातील गरीब आणि सामान्य माणूस यामध्ये पिसला जातो. या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला तिथे वेगळं काही व्यक्त करण्याची गरज नव्हती. ती पिच छगन भुजबळ यांची होती. त्यांनी फूल बॅटिंग केलेली मी पाहिली. खूप दिवसांनी एक चांगलं भाषण बघायला मिळालं. त्यांच्या वयाचा, अनुभवाचा अंदाज घेता आणि मराठा समाजाच्या अस्वस्थेचा अंदाज घेता भविष्यात या प्रश्नावर मधला मार्ग निघेल याचा मला विश्वास आहे”, असं सांगत पंकजांनी भुजबळांच्या भाषणाचं कौतुक केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> “एक मंत्री उघडपणे…”, संभाजीराजे शिंदे सरकारवर भडकले, भुजबळांचा राजीनामाच मागितला

“राजकीय आरक्षणाचा आग्रहच नाही”

“मराठा समाजाचे लोक गरीब असतील, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती आणि जाणीव आहे. त्याचबरोबर ओबीसी जे जन्माने मागास आहेत त्यांच्याबद्दल प्रेम, जाणीव आणि चिंता आहे. आरक्षणाचा मुख्य गाभा हा आर्थिक मागासलेपण नसून हे सामाजिक मागासलेपण आहे. आपण घटनेत दिलेल्या आरक्षणाचा विचार करता भटके-विमुक्तांना देखील सुरक्षा देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे जातीय जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाचा राजकीय आरक्षणाचा आग्रहच नाही”, अशी मोठ आणि महत्त्वाची भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT