Rajya Sabha : शरद पवारांनी 'या' निवडणुकीमुळे सोडली होती काँग्रेस! काय घडलं होतं 1998 मध्ये?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटींग होणे ही काय नवीन गोष्ट नाही आहे. याआधी 1998 मध्ये देखील राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटींग झाली होती. या क्रॉस वोटींगच खापर शरद पवारांवर (Sharad Pawar) फोडण्यात आले होते.
why sharad pawar leave congress rajya sabha elction result ncp 1998 rajya sabha cross voing himachal political crisis
social share
google news

Why Sharad Pawar Leave Congress : हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या निवडणुकीची देशभरात चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना क्रॉस व्होटिंग करून जिंकून दिले होते. यानंतर हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राज्यसभा निवडणूक  (Rajya Sabha Election) चर्चेत आली होती. पण राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटींग होणे ही काय नवीन गोष्ट नाही आहे. याआधी 1998 मध्ये देखील राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटींग झाली होती. या क्रॉस वोटींगच खापर शरद पवारांवर (Sharad Pawar) फोडण्यात आले होते. त्यामुळे नेमकं 1998  च्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलेलं? हे जाणून घेऊयात. (why sharad pawar leave congress rajya sabha elction result ncp 1998 rajya sabha cross voing himachal political crisis) 

1998 च्या निवडणुकीत काय घडलं? 

काँग्रेसने 1998 च्या महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधानला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यावेळी विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारावर काँग्रसे पक्ष दोन्ही जागा सहजपणे जिंकु शकत होता. तर भाजपने प्रमोद महाजन आणि शिवसेनेचे सतीश प्रधान आणि प्रीतीश नंदी यांना उमेदवारी दिली होती. यासोबत सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा हे दोन अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

हे ही वाचा : Prajakt Tanpure : अजित पवारांनी दिला मागून आवाज...'ये माझ्याकडे, काम...',

या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राम प्रधान यांचा पराभव झाला तर सुरेश कलमाडी आणि दर्डासोबत इतर उमेदवार जिंकले होते. यावेळी काँग्रेसच्या एका गटाने राम प्रधान यांच्या पराभवास शरद पवारांना जबाबदार धरले होते. शरद पवार हे राज्यसभा निवडणुकीत राम प्रधान यांच्या उमेदवारीच्या विरोधात होते, असा काँग्रेसच्या एका गटाचा आरोप होता. या प्रकरणी काँग्रेसने 10 आमदार आणि प्रफुल पटेल यांच्यासह शरद पवारांच्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या घटनेमुळे काँग्रेसने शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांना 1999 च्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट देखील दिले नव्हते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'या' कारणामुळे पवारांनी राष्ट्रवादी पक्ष काढला

1998 च्या राज्यसभा निवडणुकीनंतर शरद पवारांना पक्षांतर्गतच घेरले गेले होते. यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शरद पवार काँग्रेस सोडण्यामागचं एक कारण सोनिया गांधी देखील आहेत. 

हे ही वाचा : Lok Sabha : मविआला बसणार झटका, महायुतीचं काय होणार?

खरं तर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनवण्याची चर्चा पक्षात सुरु होती. यानंतर शरद पवार, तारिक अनवर आणि पीए संगमा यांनी बंडखोरी केली. या तीनही नेत्यांनी सोनिया गांधी विदेशी असण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या नेत्यांचं म्हणणं होतं की एखाद्या परदेशी वंशाच्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान कसा बनवता येईल? असा सवाल केला होता. काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवली. शरद पवारांनी तारिक अनवर आणि पीए संगमासोबत मिळुन 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची स्थापना केली होती. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT