CM फडणवीस शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा कापणार पत्ता?, कॅबिनेटमध्ये स्थानच नाही?

मुंबई तक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही दिग्गज नेत्यांचा समावेश करणार नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जाणून घ्या कोणत्या नेत्यांना मिळू शकतो डच्चू.

ADVERTISEMENT

CM फडणवीस शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा कापणार पत्ता?
CM फडणवीस शिवसेनेच्या 'या' नेत्यांचा कापणार पत्ता?
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल (5 डिसेंबर) आझाद मैदानावर शपथ घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनीही शपथ घेतली. पण आता यानंतर सगळ्यांच्या नजरा या नव्या मंत्रिमंडळाकडे लागून राहिलं आहे. नव्या मंत्रिमंडळात नव्या तरूणांना संधी देण्यात येईल असं बोललं जात आहे. पण यासोबतच काही मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. त्यातही विशेषत: शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर सध्या टांगती तलवार आहे. (will cm devendra fadnavis not give place to shiv sena leaders abdul sattar deepak kesarkar tanaji sawant and sanjay rathod in his cabinet)

देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. अशावेळी आपल्या मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्री असू नयेत याची त्यांच्याकडून काळजी घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांचा फडणवीस कापणार पत्ता?

2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील दिग्गज नेते आणि तत्कालीन मंत्री हे बाहेर पडले होते. ज्यानंतर शिंदेंनी सत्ता स्थापन केल्यावर त्या दिग्गज नेत्यांना मंत्रिपद देऊ केलं होतं. पण त्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना हव्या असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आलं होतं.

हे ही वाचा>> संसदेत राडा... 'या' खासदाराच्या बाकावर सापडलं नोटांचं बंडल, नेमकं प्रकरण काय?

मात्र, आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नेमका कोणचा समावेश करायचा याचा सगळे अधिकार आता त्यांच्याकडे नाही. याबाबत संपूर्ण अधिकार हे फडणवीसांकडे आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp