सरकार स्थापनेवरुन सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदाच बोलले, ‘एकनाथ शिंदे गटाकडून…’
मुंबई: एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात गेलेला असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपचे सर्व मोठे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकीला जमले होते. बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची उकल मुनगंटीवारांनी केली आहे. भाजप अजूनही […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात गेलेला असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपचे सर्व मोठे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकीला जमले होते. बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची उकल मुनगंटीवारांनी केली आहे.
भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत. राज्यासमोरचे राजकीय प्रश्न आणि सध्याच्या परिस्थीतीवर बैठकीत चर्चा झाली. संपूर्ण परिस्थीती पाहून भाजप भूमिका घेईल असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवारांचे (Sudhir Mungantiwar) मोठे विधान
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अविश्ववास ठरावाची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील परिस्थीती जशी पुढे जाईल आमच्याकडे जसे प्रस्ताव येतील त्यानंतर पुन्हा कोअर कमिटीची बैठक होईल आणि पुढील निर्णय घेतला जाईल असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. गुहावटीतील आमदारांना बंडखोर म्हणू नका कारण ते स्वत: ला बंडखोर नाहीतर खरे शिवसैनिक समजतात आणि आम्हीही त्यांना बंडखोर समजत नाही असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.