‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका
ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपने त्यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेतला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेला आज (7 जुलै) शिंदे गटाने (Shinde Group) मोठा धक्का दिला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनाच गळाला लावत शिंदेंनी ठाकरे गटाला आणखी एक खिंडार पाडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश पार पडला. याच पक्ष प्रवेशानंतर निलम गोऱ्हे यांनी थेट शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका केली आहे. (thackeray group deputy speaker legislative council neelam gorhe strongly criticized sushma andhare shinde group bjp withdrawn no confidence motion against him)
सुषमा अंधारे पक्षात आल्यामुळे आपली नाराजी आहे का? असा सवाल निलम गोऱ्हे यांना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट सुषमा अंधारे यांना सटर-फटर म्हणत त्यांच्यावर टीका केली.
‘सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीए’
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहता आहात. असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वैगरे असं कुठेच नसतं. नाराजी वैगरे असली तरी पक्षाचे नेते आले की, पक्षाचे नेते आले की ती नाराजी विसरत असतात. त्यातून सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीए.’ अशी थेट टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Samruddhi Accident : ‘त्या’ बस अपघाताबद्दल मोठी अपडेट! चालकाच्या रक्तात सापडले…
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी का प्रवेश केला याबाबत त्या म्हणाल्या की, ‘सद्य स्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे.’ असंही गोऱ्हे म्हणाल्या.