शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने! धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांची बाचाबाची

मुस्तफा शेख

प्रभादेवीतल्या हाय व्होल्टेज राजकीय राड्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा समोरासमोर आले आहेत. गुरूवारी धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली असल्याचं समोर आलं आहे. धारावी शाखेच्या उद्घघाटनच्या वेळी सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. या वादानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट धारावी पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रभादेवीतल्या हाय व्होल्टेज राजकीय राड्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा समोरासमोर आले आहेत. गुरूवारी धारावीत सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली असल्याचं समोर आलं आहे. धारावी शाखेच्या उद्घघाटनच्या वेळी सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. या वादानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट धारावी पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय आहे धारावीतल्या वादाचं प्रकरण?

मुंबईतल्या धारावी भागात आमदार सदा सरवणकर तसंच विभाग प्रमुख गिरीश धानोळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी निवडण्यासाठीची बैठक ठेवण्यात आली होती. याच दरम्यान ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी येऊन या ठिकाणी गोंधळ घातला असा आरोप केला जातो आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या बाचाबाची

यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाचाबाची झाली. अखेर शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धारावी पोलीस ठाण्यात पोहचले. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय आहे. या प्रकरणात पोलीस आता काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार धारावीत देवीची मिरवणूक होती. त्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. सगळे कार्यकर्ते मिरवणुकीत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यावर जाब विचारला असता बाचाबाची झाली असं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp