Kalyan: उद्धव ठाकरेंकडून ‘पवार पॅटर्न…’, श्रीकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारी, पण…
Uddhav Thackeray vs Shrikant Shinde: शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्याची सुरुवात त्यांनी ‘पवार पॅटर्न’पासून केली आहे. जाणून घ्या नेमका काय आहे पवार पॅटर्न..
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray follow Pawar Pattern: कल्याण: महाराष्ट्रात विधानसभा 2019 च्या निवडणुकीने राज्यासह देशभरातील सगळं राजकारणच बदलून टाकलं. अनपेक्षितपणे भाजपच्या कमी झालेल्या जागा अन् शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून मिळवलेली सत्ता याने देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र, 2022 साली एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांचं मुख्यमंत्री पद गमवावं लागलेलं. असं असताना आता पक्ष आणि चिन्ह गमवण्याची नामुष्की देखील ठाकरेंवर ओढावली आहे. त्यामुळे याच गोष्टीचा राजकीय बदला घेण्याचा निश्चिय करून उद्धव ठाकरे हे स्वत: रिंगणात उतरले आहेत. पण यासाठी त्यांनी ‘पवार पॅटर्न’ (Pawar Pattern) वापरण्याचं निश्चित केलं आहे. (uddhav thackeray follows pawar pattern shiv sena ubt plans strategy to defeat shrikant shinde in kalyan lok sabha constituency)
आता तुम्ही म्हणाल की, उद्धव ठाकरे आणि पवार पॅटर्न हे काय नवीन…? तर त्याबाबत आम्ही तुम्हाला थोडंसं उलगडून सांगणार आहोत.. म्हणजे कसंय ना.. तुम्हाला कन्फूजन राहणार नाही!
चला तर जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा ‘पवार पॅटर्न’ आहे तरी काय..
शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा रोवला अन् उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. एवढंच नव्हे तर स्वत:चा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांना गमवावं लागलं. खरं तर हा घाव ठाकरेंच्या जास्तच जिव्हारी लागला.. एकीकडे सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा ठाकरेंचा विरोधात गेलेला असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरेंनी थेट जनतेत जाणं पसंत केलं आहे.
ज्याची सुरुवात आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातून केली आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी ‘पवार पॅटर्न’ वापरला.










