विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून नाराज अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झालीये. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजी फटका विधान परिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसनं नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झालीये. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजी फटका विधान परिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसनं नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.
राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आवश्यक मतांची संख्या नसतानाही भाजप आणि काँग्रेसनं जास्तीचा एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक रंगदार अवस्थेत पोहोचली आहे.
आघाडी की, भाजप… विधान परिषद निवडणुकीत कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार?, आकडे काय सांगतात?
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चौथी जागा जिंकण्याचा विश्वास होता, पण भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीत सावध झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीची मदार अपक्षांवर आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.