पत्रकार परिषद शरद पवारांची, पण चर्चा सोनिया दुहानांची, त्या कोण आहेत?
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीमधील अनेक तरुण चेहरे त्यांच्या शेजारी आणि मागे बसले होते. पत्रकार परिषद जरी शरद पवारांची असली तरी या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु आहे, ती पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची.
ADVERTISEMENT

तुम्ही शरद पवारांची अलिकडची पत्रकार परिषद पाहिली असेल. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. पवार पत्रकार परिषद घेत असताना सहसा त्यांच्या मागे कोणी बसत नाही. पण, या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीमधील अनेक तरुण चेहरे त्यांच्या शेजारी आणि मागे बसले होते. पत्रकार परिषद जरी शरद पवारांची असली तरी या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु आहे, ती पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची. शरद पवारांच्या संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान नेमक्या कोण आहेत हेच समजावून घेऊयात… (who is sonia duhan)
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांच्या आजूबाजूला रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सोनिया दुहान, सक्षणा सलगर अशी राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड होती. त्यामुळे यातून पवार काही वेगळा संदेश देतायेत का अशा देखील चर्चा होत्या. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे पवरांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची.
हरियाणाच्या रहिवाशी, पुणे कनेक्शन… सोनिया दुहान कोण?
सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोनिया या अध्यक्षा आहेत. सोनिया या मूळच्या हरियानाच्या रहिवासी. बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या वैमानिकाचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आल्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्या. अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्यास सुरुवात केली. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व देखील केलं आहे.
Only Sharad Pawar Sahab @PawarSpeaks pic.twitter.com/Db6KGoj4Lu
— Sonia Doohan (@DoohanSonia) May 5, 2023










