राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंमुळे हितेंद्र ठाकूर शिवसेनेपासून दूर जाणार?
राज्यसभा निवडणूक १० जून रोजी होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. एकही मत फुटू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहण्यास मिळतं आहे. अशात मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी ते एकनाथ शिंदेंवर चांगलेच नाराज असल्याचं म्हटलं आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणूक १० जून रोजी होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. एकही मत फुटू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहण्यास मिळतं आहे. अशात मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी ते एकनाथ शिंदेंवर चांगलेच नाराज असल्याचं म्हटलं आहे. यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंमुळे हितेंद्र ठाकूर शिवसेनेपासून दूर जाणार ही…
काय म्हणाले हितेंद्र ठाकूर?
“मी बेधडक बोलणारा आणि वागणारा माणूस आहे. माझ्या ओठात एक पोटात एक काही नसतं. काही खात्यांमार्फत काही मंत्री न्याय देतात. मी कुणाचं नाव घेत नाही पण काही खात्यांमार्फत मला चांगली मदत झाली पण काहींकडून झाली नाही. १०० टक्के मी नाखुश आहे का? तर तसं मुळीच नाही पण १०० टक्के खुश आहे का ? तर त्याचंही उत्तर नाही हेच आहे.”
”ग्लास अर्धा भरलेला की ग्लास रिकामा हे तत्वज्ञान मलाही कळतं. मी अर्ध्या भरलेल्या ग्लासकडेही अर्धा भरलेला ग्लास म्हणूनच पाहतो. मी नेहमी रिकामं बघत नाही. मात्र काही खात्यांनी ग्लास अर्धाच केला असेल तर आम्ही गप्प बसू शकत नाही. जे आमचं होतं ते काढण्याचाही प्रय़त्न केला गेला. ”