Asia Cup Final 2023 : रोहित शर्मा करणार विक्रमांची मालिका, तेंडुलकर-धोनीला टाकणार मागे!
रोहित शर्मा आशिय कप 2023 मध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणार आहे. सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाबरोबरच सचिन तेंडुलकरच्या धावांचा विक्रमही मोडण्याची संधी रोहित शर्माला आहे.
ADVERTISEMENT

Rohit Sharma Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना आज (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असेल, तर दासून शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करणार आहे. (Rohit Sharma will set a series of records in the Asia Cup 2023 final)
या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर खिळल्या आहेत. अंतिम सामन्यात मैदानावर येताच रोहित एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. रोहित शर्मा पाचव्यांदा आशिया कप फायनलमध्ये खेळणार आहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक वेळा फायनल खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईल.
या बाबतीत रोहित शर्मा मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी, नवज्योतसिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकेल. हे सर्व खेळाडून प्रत्येकी चार फायनल खेळलेले आहेत.
सचिनचा विक्रम एक पाऊल दूर
रोहित शर्माने अंतिम सामन्यात 33 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. रोहित शर्मा या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. एवढेच नाही तर 61 धावा केल्यानंतर रोहित आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावाही पूर्ण करेल.