राम मंदिराच्या देणगीत तिपटीने वाढ; तिरुपतीसारखं मोजणीसाठी शेकडो कामगार…
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरासाठी देणगी (Donation ) म्हणून मिळालेल्या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या १५ दिवसांत मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता (Prakash Gupta) यांच्या म्हणण्यानुसार, देणग्या मोजून जमा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टला सांगितले की […]
ADVERTISEMENT

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरासाठी देणगी (Donation ) म्हणून मिळालेल्या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या १५ दिवसांत मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता (Prakash Gupta) यांच्या म्हणण्यानुसार, देणग्या मोजून जमा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टला सांगितले की जानेवारी 2023 पासून देणग्या तीन पटीने वाढल्या आहेत. (Donation to Ram temple tripled; Cash system will become like Tirupati)
गुप्ता यांनी सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्रस्टच्या बँक खात्यात रोख मोजण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 2 अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी येणाऱ्या देणग्या झपाट्याने वाढत आहेत. आगामी काळात तिरुपती बालाजीच्या धर्तीवर येथेही व्यवस्था करण्यात येणार आहे. रोख मोजणी करण्यात शेकडो कामगार गुंतणार आहेत.
2024 मध्ये गर्भगृह भक्तांसाठी खुले होणार
उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराचे काम जोरात सुरू आहे. मंदिर आता दिव्य रूपात दिसत आहे. डिसेंबर 2023 पर्यंत रामाचे गर्भगृह तयार होईल आणि जानेवारी 2024 नंतर म्हणजेच मकर संक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुले केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू राहणार आहे. राम दरबार व्यतिरिक्त माता अन्नपूर्णा, भगवान शंकर, बजरंगबलीसह अनेक मंदिरे येथे बांधली जाणार आहेत.