माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन; क्रिकेट जगतावर शोककळा

मुंबई तक

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Former Australian cricketer) अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचं निधन झालं. अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा शनिवारी रात्री टाऊन्सव्हिले येथे अपघतात झाला. गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र यश आलं नाही. (Former Australian cricketer Andrew Symonds dies in road accident) क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितलं की, शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Former Australian cricketer) अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचं निधन झालं. अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा शनिवारी रात्री टाऊन्सव्हिले येथे अपघतात झाला. गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र यश आलं नाही. (Former Australian cricketer Andrew Symonds dies in road accident)

क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितलं की, शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे रेंज येथे रात्री अंदाजे १०.३० वाजता एक अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपास वेगात असलेली कार रस्त्यावरच उलटून पडली. या कारमध्ये माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स होता.

ही दुर्दैवी घटना एलिस रिव्हर ब्रिजजवळ घडली. घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेतून अँड्र्यू सायमंड्सला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचे पुरेपुर प्रयत्न केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp