IND vs PAK: टॉस हरल्यानं भारताला सामना जिंकणं कठीण, जाणून घ्या 5 कारणं
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा आशिया चषक-2022 मध्ये सामना खेळवला जात आहे. यापूर्वी दोन्ही संघ 28 ऑगस्टला आमनेसामने आले होते आणि त्यानंतर भारताने विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा टीम इंडियाची नजर विजयावर आहे, तर पाकिस्तानला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करताना पाहायला मिळतील. या सामन्यात पाकिस्तानने […]
ADVERTISEMENT

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा आशिया चषक-2022 मध्ये सामना खेळवला जात आहे. यापूर्वी दोन्ही संघ 28 ऑगस्टला आमनेसामने आले होते आणि त्यानंतर भारताने विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा टीम इंडियाची नजर विजयावर आहे, तर पाकिस्तानला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करताना पाहायला मिळतील. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या या निर्णयानं भारताची चिंता वाढवली आहे. कारण या सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला आहे. या सामन्यात नाणेफेक हरणारा संघ अडचणीत येऊ शकतो. त्याच कारण काय आहे जाणून घेऊयात.
नाणेफेक हरल्यानं भारताला काय त्रास होऊ शकतो?
1) हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्टेडियमच्या खेळपट्टीवरती ग्रास आहे जे वेगवान गोलंदाजांना मदत करेल. अशा स्थितीत पहिला डाव खेळणारा संघ अडचणीत येणार आहे.
2) खेळपट्टीवर ओलावा आहे आणि सुरुवातीला गोलंदाजी करणारा संघ त्याचा पुरेपूर फायदा घेईल. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे कठीण होईल आणि संघाला सुरुवातीच्या विकेट्स गमवाव्या लागतील ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात.