Asia Cup 2022, IND vs SL: आज जिंकावंच लागणार! टीम इंडीया करणार श्रीलंकेशी दोन हात
Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना आज (6 सप्टेंबर) श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी ही करो या मरोची लढत आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. कोहलीसाठी फॉर्म ही टीम इंडीयासाठी जमेची […]
ADVERTISEMENT

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना आज (6 सप्टेंबर) श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी ही करो या मरोची लढत आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
कोहलीसाठी फॉर्म ही टीम इंडीयासाठी जमेची बाजू
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली गोष्ट म्हणजे टॉप-3 फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांनीही आक्रमक फलंदाजी केली. कोहली भलेही त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसेल, पण रविवारी त्याने त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आशिया चषकात सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने आपल्या टीकाकारांनाही आपल्या बॅटने उत्तर दिलं आहे.
ऋषभ पंत की दिनेश कार्तिक यांच्याबाबत संघात चर्चा सुरू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाला खेळवण्यात आले. कार्तिकला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली असली तरी त्याला बाहेर ठेवल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते. भारताला आपल्या मधल्या फळीबाबत योग्य विचार करावा लागणार आहे.
दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत भारताकडे गोलंदाजीत खेळण्यासाठी फारसे पर्याय नाहीत. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरला होता. भुवनेश्वर कुमारला आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवता आली नाही त्यामुळं संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.